Delta Variant Google file photo
विदर्भ

विदर्भात 'डेल्टा प्लस'चा शिरकाव, भद्रावती अन् अकोल्यात आढळले रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

भद्रावती (जि. चंद्रपूर) : शहरातील सुमठाणा परिसरात डेल्टा प्लस व्हेरिअंटचा पहिला बाधित रुग्ण (delta plus patient chandrapur) आढळल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग यांनी दिली. या रुग्णाची प्रकृती अगदी चांगली आहे. मात्र, सावधगिरी बाळगून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करणे सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आङे.

गेल्या १६ जुलैला घेण्यात आलेले काही नमुने पुण्याच्या एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले होते. तपासणीमध्ये सदर महिला बाधित आढळून आली. दरम्यान, यासंदर्भात स्थानिक पालिकेत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थानिक आरोग्य प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे डॉ. मनीष सिंग यांनी सांगितले.

अकोल्यातही आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण -

अकोट शहरातील एका ५७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटची लागण झाल्याची बाब गुरूवारी (ता. १२) समोर आली. सदर रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्याच्यावर यापूर्वीच रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्याचा स्वॅब २९ जून रोजी दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. प्रयोगशाळेचा अहवाल तब्बल दीड महिन्यानंतर गुरुवारी (ता. १२) पॉझिटिव्ह आला. अहवाल जिल्हा स्तरावर प्राप्त होण्याआधीच रुग्णाने कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर मात केली असून त्याची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याची माहिती आहे. परंतु, त्यानंतर सुद्धा आरोग्य विभागाच्या पथकाने गुरुवारी रुग्णाच्या घरी जावून तपासणी केली.

अकोट शहरातील अकोट-अकोला रोडवरील रहिवाशी एका ५७ वर्षीय व्यक्तीला जून महिन्यात कोरोनाची लगण झाली होती. त्यामुळे त्याच्या स्वॅबची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. दिल्ली येथील प्रयोगशाळेत जिल्ह्यातून प्रत्येक महिन्याला विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) करण्यासाठी काही नमुने पाठवण्यात येतात. त्यामध्ये सदर रुग्णाच्या स्वॅबचे नमुने जून व जुलै महिन्याच्या एकत्रित तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल गुरुवारी (ता. १२) आरोग्य विभागाला मिळाला. त्यामध्ये अकोट येथील ५७ वर्षीय रुग्णाला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रुग्णाची सध्याची स्थिती माहित केली असता रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो आता ठणठणीत असल्याचे कळले. परंतु असले तरी रुग्णाच्या संपर्कातील इतर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावरुन एक पथक अकोट येथे गेले.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विदर्भात थैमान घातले होते. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटचा पहिला रुग्ण हा विदर्भातीलच अमरावतीमध्ये सापडला होता. त्यानंतर संपूर्ण विदर्भात या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले होते. अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. मात्र, दोन महिन्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तसेच विदर्भातील भंडारा जिल्हा हा कोरोनामुक्त झालेला पहिला जिल्हा ठरला आहे. पण, आता चंद्रपुरात सापडलेल्या डेल्टा प्लसच्या रुग्णामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची रेलचेल देखील वाढली आहे. मात्र, आता डेल्टा प्लसचा रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT