delta plus variant Sakal
विदर्भ

विदर्भात डेल्टाची धडक; अमरावती, गडचिरोली व भंडाऱ्यात आढळले रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाची दुसरी लाट थोपविल्यानंतर काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियन्टने विदर्भात धडक दिली. अमरावती जिल्ह्यात डेल्टाचे सहा रुग्ण आढळून आल्याची बाब मंगळवारी उजेडात आली. या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तर गडचिरोलीतही सहा आणि भंडाऱ्यात एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाला धडकी भरली आहे.

अमरावती मनपा क्षेत्रात तीन तर मोर्शी, वरुड तसेच चांदूरबाजार तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले. सहाही रुग्णांना यापूर्वी कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून, डेल्टा व्हेरियन्टचा संशय असल्याने त्यांचे स्वॅब राज्यस्तरावर प्रयोगशाळा चाचणीसाठी पाठविले होते.

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सहा जणांना डेल्टाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर आतापर्यंतच्या कोरोना प्रोटोकॉलनुसारच उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सहा रुग्णांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तर या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याची माहिती सुपर स्पेशालिटीमधील कोविड रुग्णालयाच्या प्रमुखांनी दिली. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

अमरावती जिल्ह्यात डेल्टा व्हेरियन्टचे सहा रुग्ण आढळले. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील तसेच कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब घेण्यात येतील.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी
अमरावती जिल्ह्यात आढळलेल्या डेल्टा रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. नागरिकांनी काळजी करू नये, मात्र कोरोना अद्याप गेलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक वर्तन आजही गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे या उपाययोजना कराव्या.
- डॉ. रवीभूषण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल

पूर्व विदर्भात धडकी

गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी सहा तर भंडारा जिल्ह्यात एका डेल्टा प्लस रुग्णांची नोंद करण्यात आली. कोरोना विषाणूच्या या नव्या रूपाचे रुग्ण सापडल्याने अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ५६९ कोरोना तपासण्यांपैकी ८ नवीन बाधित आढळून आले. भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील कोणातही डेल्टा प्लसची लक्षणे दिसली नाही. भंडारा तालुक्यातील या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने जून महिन्यात तपासणीसाठी पाठविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT