Demand for financial assistance from the state government to the Gurav community 
विदर्भ

मंदिरातील देव प्रकाशात ठेवणारे पूजारी अंधारात, शासनाकडे अर्थसाहाय्याची मागणी 

केवल जीवनतारे

नागपूर : गावाच्या बारा बलुतेदारांपैकी एक गुरव समाज. गावातील देवाची दैनंदिन पूजा करण्यासोबतच मंदिराचे पावित्र्य राखणे, तेल-वात करणे, मंगल कार्यात शिंग वाजवणे, सनई, मृदंग, पखवाज, तबला वाजवणे अशा कलेतही पारंगत असलेला गुरव समाज पूजाअर्चा करून देवापुढील उत्पन्नातून मिळणाऱ्या मानधनावर त्यांचे जगणे होते. आजही साठ ते सत्तर समाजाचे पोट पूजेवरच अवलंबून आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन झाले. मंदिराच्या दरवाजांना सात महिन्यांपूर्वी लागलेले कुलूप अद्यापही उघडले नाही. भक्तांचे दान पदरात पडले नसल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरात देव प्रकाशात ठेवण्यासाठी सकाळीच जाणारा पुजारी मात्र अंधारात सापडला आहे. राज्य शासनाने त्यांना अर्थसहाय्य करून त्यांचे जगणे सुकर करावे हीच या समाजाची मागणी आहे.

गुरव शब्द ओठांवर आला की, नजरेसमोर डोक्याला गंध, सोवळे नेसलेला, मंदिरात मनोभावे पूजाअर्चा करणारा आणि भक्ताचे मागणे देवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचवणारा पुजारी असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. ताम्रपटापासून तर अनेक दुर्मिळ ग्रंथांमध्ये गुरव समाजाचा उल्लेख आढळतो. गावखेड्यातील ग्रामव्यवस्थेत शेती  व्यवसाय असताना गावकऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी विविध जातीनुसार व्यवसाय उभे रहिले. त्यांना कामाच्या मोबदल्यात शेतीचे उत्पन्न मिळे, याला बलुतं म्हणत असत. 

बारा बलुतेदारांपैकी एक गुरव समाज आहे. देवाची पूजा करणे हा त्यांचा व्यवसाय. यावरच त्यांची गुरव समाजाची उपजीविका सुरू होती. पुढे प्राचीन राजे रजवाडे , इंग्रजांच्या राजवटीत यासाठी मंदिराच्या देखभालीसाठी, निर्वाहारासाठी काही इनाम जमिनी दिलेल्या आहेत, परंतु विश्वस्त कायद्याने त्या इनाम जमिनी वरील हक्क निघून गेला. सेवा मात्र राहिल्या. काही जमिनी सामाजिक विकासासाठी सरकारने विनामोबदला ताब्यात घेतल्या तर काही जमिनी गावातील वजनदार व्यक्तींनी त्यवर कब्जा केला. 

दुसरे उपजीविकेचे साधन नाही. यामुळे गरीब गुरव पुजारी आहे त्याच अवस्थेत जगत आहेत. अनेक वर्षे याबाबत गुरव समाजाच्या संघटना व सरकार यांच्यात वर्षे संघर्ष सुरू आहे. गुरव समाजाच्या विविध मागण्यांचा शासन विचार करीत नाही. त्यामुळे देव उजेडात आणि गुरव अंधारात अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे.

शहराकडे धाव 

बदलत्या काळानुसार गावखेड्यातील गुरव समाजातील तरुण शहराकडे धाव घेऊ लागला. शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी शहृरात आला. शहरातच स्थिरावत आहे. अथक परिश्रमातून कोणी डॉक्टर, कोणी वकील, तर कोणी सरकारी नोकरीत आहेत. गुरव समाज बांधावांपैकी काही उच्चपदस्थ आहेत. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करीत आहेत. महारष्ट्रात ३० लाखांपेक्षा जास्त गुरव समाजाची लोकसंख्या आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात आजही गुरव समाजातील बांधव मंदिरात पुजाअर्चना करीत आहेत. त्यांचे जगणे लॉकडाउनमुळे संकटात आले आहे. नुकतेच अखिल भारतीय गुरव समाज संघटनेच्या वतीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनातून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी केली आहे, असे संघटनेचे सचिव बद्रिकेदार लसने यांनी सांगितले. 

अशा आहेत मागण्या...

  • गुरव समाजातील पुजाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी
  • जमीन कसणाऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट आले त्यांना पीक कर्ज द्यावे
  • इनामवर्ग-३ जमिनी मूळ सनदधारकांना जमीन द्यावी
  • पुजाअर्चना करण्याचा परंपरगात हक्क कायम ठेवण्यात यावा
  • तरूणांसाठी शिक्षणासह उद्योग उभारण्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे
  • सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये गुरव समाजाला ५० टक्के प्रतिनिधीत्व मिळावे
  • ॲट्रासिटीसारखा कायद्याचे संरक्षण गुरव समाजाला मिळावे
  • साठीनंतर पुजा अर्चना करणाऱ्यांना निर्वाह भत्ता लागू करावा 
  • बेलफुल वाहणारे, वाद्य वाजवणाऱ्यांना आर्थिक मदत करावी


संपादन  : अतुल मांगे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT