dental problems
dental problems  
विदर्भ

कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना दातांची समस्या; दंतरोग तज्ज्ञांचं मत

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : "कोविड-19'ने जगाला हादरा दिला आहे. दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये दातांची समस्या निर्माण होत आहे. त्याला म्युकॉरमायकोसिस म्हणून संबोधले जाते. मात्र, हा आजार संसर्गजन्य नाही. वेळीच उपचार घेतल्यास त्यावर मात करता येते, अशी माहिती दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत तामगाडगे यांनी दिली.

पोस्ट कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या आजार व काळजी या संदर्भात डॉ. तामगाडगे यांनी दैनिक"सकाळ'शी संवाद साधला. म्युकॉरमायकोसिस दूर्मिळ असला तरी नवा नाही. रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांत ब्लॅक फंगस म्हणजे म्युकॉरमायकोसिस होणे, मृत्यू होणे अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. मात्र, कोविड काळात त्याची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ही समस्या दिसत आहे.

या विकाराला झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखले जाते. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल (सीडीसी) प्रिव्हेंशन म्हणण्यानुसार हा बुरशीजन्य संसर्ग दूर्मिळ आहे. गेल्या 20-25 दिवसांत दंतचिकित्सकांकडे म्युकॉरमायकोसिसच्या केसेस आढळल्या आहेत. मानव शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. तेव्हा तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो.

खुल्या जखमामधूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते. म्युकॉरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही. म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही, असेही सीडीसीने स्पष्ट केले आहे. योग्य निदान आणि उपचाराने रुग्ण लवकर बरे होतात, ही जमेची बाजू आहे. मधूमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना म्युकॉरमायकोसिसचा जास्त धोका आहे.

लक्षणे ओळखा

तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, डोके दुखणे, सायनस रक्तसंचय, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्याच्यावर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.

सिटीस्कॅन, एंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकॉरमायकोसिसचे निदान करता येते. बुरशीप्रतिकारक उपचार पद्धतीचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. मात्र, संसर्ग शरीराच्या इतर अवयावापर्यंत पोहोचल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. उपचार करण्यास विलंब झाल्यास होणारी गुंतागुंत या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते. पंधरा दिवसात संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास जिवावर बेतण्याची भीती असते.
-डॉ. प्रशांत तामगाडगे, कन्सल्टंट ओरल ऍण्ड मॅस्किकोफॅसीकल सर्जन, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT