यवतमाळ : मागील काही दिवसांत शहरी व ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यामधील सोन्याचे दागिने उडविल्याची ओरड होत आहे. दिवाळीचा सण ‘कॅश' करण्यासाठी इराणी टोळीने जिल्ह्यात डेरा टाकल्याचा संशय पोलिस वर्तुळातून व्यक्त होत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग असते. त्यासाठी घरात पैसेही आणून ठेवले जाते. दिवाळीला महिला गळ्यात सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडतात. बाजारपेठेतही गर्दी होत आहे. नेमके याच संधीचे सोने करण्यासाठी परजिल्ह्यांतून इराणी टोळी जिल्ह्यात डेरेदाखल झाली आहे. आपण कपडे व किरकोळविक्रेते असल्याचा बनाव करून ते दारोदार फिरताना दिसत आहेत. बोलण्यास मिठासपणा असल्याने नागरिकांना त्यांच्यावर संशय येत नाही. कोणतीही वस्तू घेण्यासाठी त्यांच्याकडून आग्रह केला जातो.
विशेष म्हणजे, त्यांच्या बोलण्यात महिला वर्ग अडकतात. विक्रीच्या निमित्ताने घराची पाहणी केल्यावर ही टोळी आपला हेतू साध्य करतात. शिवाय बाजारपेठ व घराबाहेर फिरणाऱ्या महिलांच्या दागिन्यांवर या टोळीची विशेष नजर असते. चैन स्नॅचिंगमध्ये ही टोळी विशेष माहीर असल्याची कुंडली पोलिसांकडे आहे. मागील काही दिवसांपूर्वी आठ लाख रुपयांचे दागिने उडविण्यात आले होते. याशिवाय यवतमाळ शहरासह तालुक्यात दागिने चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत.
जाणून घ्या : खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १८ हजार कोटींची मदत
काहींच्या तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहे, तर काही लोक पोलिसांत जाणे टाळत आहेत. अवधूतवाडी पोलिसांनीही अलीकडे चोरीच्या घटना इराणी टोळीकडे वाढल्याचा संशय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केला आहे. दिवाळी व त्या नंतर वाढणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
आमचा तपास सुरू
इराणी टोळीतील चोरटे परजिल्ह्यांतील रहिवासी आहेत. उंच व दिसण्यात गोरे आहेत. चेनस्नॅचिंग करण्यासह घरफोडीही त्यांच्याकडून केली जाते. ही टोळी जिल्ह्यांत आल्याचा संशय आहे. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे.
- माधुरी बाविस्कर, उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ.
उंच, दिसायला गोरे व हिंदी भाषेत बोलण्यात गोडवा असे इराणी टोळीचे वर्णन केले जाते. मारेगाव, नगर, श्रीरामपूर, ठाणे जिल्ह्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. चैन स्नॅनिंगसाठी ही टोळी प्रसिद्घ आहे. मागील काही दिवसांपूर्वी आठ लाखांचे दागिने लंपास झाले होते. त्यातही याच टोळीचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. आता दिवाळीचा सण त्यांच्याकडून कॅश केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इराणी टोळी चोरीत सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दिवाळीत खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यात रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवरही हात मारला जात आहे. गर्दीचा फायदा घेत टोळीने फिरणाऱ्या चोरट्यांकडून ही करामत केली जात आहे. पोलिसांनी इराणी टोळीसह स्थानिक चोरट्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी केली जात आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.