विदर्भ

आरक्षणापेक्षा विकास महत्त्वाचा - नितीन गडकरी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - समाजाचे प्रश्‍न लक्षात घेऊन विकासाची दिशा आपल्यालाच ठरवावी लागते. अनेक क्षेत्रांमध्ये विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी समाजात उद्यमशीलता रुजणे आवश्‍यक आहे. मराठ्यांनी आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा विकासाचे व्हिजन ठरवावे, नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा समाज कृती समिती आणि नागपूर शहर मराठा महासंघातर्फे नागपुरात ‘मराठा जागर अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार अध्यक्षस्थानी होते. 

ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याच्या बळावर विकास पादाक्रांत केला जाऊ शकतो. समाजाच्या विकासाचे व्हिजन निश्‍चित करावे. ते पूर्ण करण्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही गडकरी यांनी या वेळी दिली. नरेंद्र पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या अवस्थेकडे लक्ष वेधत त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचा विश्‍वास दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT