sakal
विदर्भ

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देवव्रतची बाजी

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्याचे नाव चमकविले.

सुधाकर दुधे

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्याचे नाव चमकविले. देवव्रत मेश्राम असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याचा रॅंक (७१३) वा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली हे तालुकास्थळ. याच गावात वसंत मेश्राम राहतात.

वसंत मेश्राम हे येथील खासगी शाळेत मुख्याध्यापक होते. गणिताचे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी. आई गृहिणी. लहानपणापासूनच हुशार असलेल्या देवव्रतचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली.

दहावीच्या परीक्षेत ८४.८, तर बारावीच्या परीक्षेत ९१.८ टक्के गुण मिळविले. त्यानंतर खरगपूर आयआयटीत त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करून तो समाधानी नव्हता.यापेक्षा मोठी झेप घेण्याचे त्याने मनोमन ठरविले. आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्याने थेट दिल्ली गाठली. दिल्लीत देवव्रत स्पर्धा परीक्षेची तयारी सूरू केली.अभ्यासात स्वताला झोकून दिले. त्याने चार वेळा परीक्षा दिली. त्यात तो उर्तीर्ण झााला.

मात्र, परीक्षेत रँक मिळत नसल्याने तो समाधानी नव्हता. त्याने परत अधिक परिश्रम घेतले. पाचव्यांदा परीक्षा दिली.आधीपेक्षा तो चांगल्या रँकने उतीर्ण झाला. या परीक्षेत त्याचा रँक ७१३ आहे. मात्र मिळालेल्या रँकवर समाधानी नाही. पुन्हा अभ्यास करून चांगल्या रँकने उत्तीर्ण होण्याचा त्याचा मानस आहे. देवव्रतचा मोठा भाऊ गोवा येथील एका महाविद्यालयात प्राध्यापकर, तर बहिण अभियंता आहे.

"मिळालेल्या रँकने मी समाधानी नाही. येत्या १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेवर मी सध्या फोकस करीत आहे."-देवव्रत मेश्राम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Jalgaon News : जळगावला 'ग्लोबल गोल्ड हब' बनवण्याची तयारी; सोन्याच्या उद्योगासाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारणार

Shubman Gill नसला तरी टेंशन नाही, देशांतर्गत स्पर्धा गाजवणारा फलंदाज संघात दाखल होतोय

Mumbai Crime: ट्रेनमधल्या कचरा डब्यात चिमुकल्याचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या एसी कोचमधील घटना

Dharashiv Video : किती भयानक आहे हे! प्रवाशी घेऊन जाणाऱ्या चालत्या एसटी बसला आग लागली, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT