Farmer suicide esakal
विदर्भ

Dhamangaon Railway News : तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; शेतमजुरानेही केले मृत्यूला जवळ

नापिकी व बँकेच्या कर्जामुळे तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

धामणगाव रेल्वे, (जि. अमरावती) - नापिकी व बँकेच्या कर्जामुळे तालुक्यातील तळणी येथील रनेश कोरचे या ४७ वर्षीय आदिवासी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन, तर चिंचपूर येथील सुनील मधुकर कारेकार चाळीस वर्षीय शेतकऱ्याने घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली.

तसेच तालुक्यातीलच तिवरा येथील देवानंद समाधान उमाळे (वय ४५) या शेतमजुराने आपल्या राहत्या घरी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. लक्ष्मीपूजनानंतरच्या दूसऱ्याच दिवशी आज सोमवारी (ता. १३) आत्महत्यांच्या तीन घटनांनी तालुका हादरला.

तळणी येथील रमेश कोरचे यांनी सोमवारी पहाटे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रमेश यांच्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता. इयत्ता नववी व अकरावीत शिकणाऱ्या दोन मुलांसोबत रमेश आपला परिवार सांभाळत होते. संयुक्त असलेल्या दोन एकर शेतीत मागील तीन वर्षांपासून नापिकी झाली आणि बँकेचे कर्ज वाढत असल्यामुळे आत्महत्या केली असल्याचे येथील उपसरपंच विशाल भैसे यांनी सांगितले.

चिंचपूर येथील सुनील कारेकार हे वडिलोपार्जित पाच एकर शेती सांभाळत होते. या शेतात मागील अनेक वर्षांपासून सततची नापिकी होत असल्याने बँकेच्या कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे सुनील यांनी घरीच दोन दिवसांपूर्वी विष प्राशन केले. अमरावती येथे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

शेतमजुराची आत्महत्या

तालुक्यातील तिवरा येथील शेतमजूर देवानंद उमाळे याने सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT