विदर्भ

धवड यांच्या अडचणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नवोदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील 38 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेले बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार अशोक शंकरराव धवड, त्यांची पत्नी किरण धवड यांच्यासह एकूण पाच जणांना अटकपूर्व जामीन विशेष सत्र न्यायालयाने नाकारला आहे. नाना देवलकर, कृष्णराव निरुळकर आणि डॉ. प्रभाकर धानोरकर अशी जामीन नाकारलेल्या इतर तीन संचालकांची नावे आहेत. 2010 ते 2015 या कालावधीत बॅंकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी ठराविक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले. तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांनी तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज परत करण्यात आले. काही वादग्रस्त मालमत्ता तारण ठेवून संचालक मंडळाने कर्ज दिले. संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी बॅंकेतून पैशांची उचल केली, तसेच रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्यानंतरही पदधिकाऱ्यांनी बॅंकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले. अशाप्रकारे आरोपींनी 38 कोटी 75 लाख 20 हजार 641 रुपयांचा गैरव्यवहार केला, असा आरोप आहे. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक (भंडारा) श्रीकांत श्रीधर सुपे यांच्या अंकेक्षण अहवालात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनात धंतोली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींमध्ये धवड यांच्यासह जवळपास 40 आरोपी आहेत. त्यापैकी अनेकांनी अटकपूर्व जामिनासाठी विशेष सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जांवर न्या. सुनील पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पाच जणांना अटकपूर्व जामीन नाकारत अर्ज फेटाळला. इतर आरोपींच्या अर्जांवर उद्या शुक्रवारी आदेश होणार आहे. आरोपींतर्फे ऍड. आंबीलवाडे आणि ऍड. बी. एम. करडे यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT