छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

कोण आहे मधुमेही आणि डॉक्‍टर यांच्यातील दुवा, वाचा...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः गोड आजार अर्थात मधुमेहाच्या विळख्यात सापडल्यानंतर यावरील उपचारात औषधोपचारापेक्षा या आजाराबाबत नव्हेतर मधुमेह या परिस्थितीतून मार्ग काढण्यासंदर्भातील माहिती अधिक महत्त्वाची असते. यासाठी ममत्वाच्या भावनेतून उपचार करणारी "परिचारिका' हा मधुमेही रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. परिचारिका योग्य समुपदेशक बनू शकते, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी आज येथे केले.
जागतिक मधुमेहदिनाच्या पर्वावर डायबेटिज केअर फाउंडेशन ऑफ इंडियाच्या रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित परिचारिकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. उद्‌घाटन परिचारिका पंचशीला मून यांच्या हस्ते झाले. एरीस लाइफ सायन्सेसचे संचालक अमित बक्षी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे मिलिंद कुकडे, मिसेस इंडिया वेस्ट एशिया डॉ. वर्तिका पाटील उपस्थित होते.
डॉ. गुप्ता म्हणाले, मधुमेही रुग्णाच्या उपचारासाठी परिचारिकांनी पुढे यावे. मधुमेहींना समजेल अशा भाषेत परिचारिकांनी समुपदेशन करावे. यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. देशातील प्रत्येक परिचारिकेने मधुमेहीच्या सल्लागार बनावे असे त्यांनी सांगितले.


मुंबईचे इन्सुलिन इंजेक्‍शनतज्ज्ञ डॉ. प्रिया कोटीयान यांनी इन्सुलिन इंजेक्‍शनच्या भारतीय नियमावलीची सखोल माहिती दिली. महाराष्ट्र आरएसएसडीआयचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांनी संदेश दिला. डॉ. वर्तिका पाटील यांनी मधुमेह आजारांशी मैत्री केल्यानंतर सामान्य जीवन जगता येत असल्याचे सांगितले. प्रारंभी रेशीमबाग परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात सीताबाई नर्सिंग कॉलेज, पीएसपीएम देशमुख कॉलेज, तिरपुडे नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह अनेक परिचारिका उपस्थित होत्या. 1500 परिचारिका सहभागी झाल्या होत्या. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देणाऱ्या परिचारिकांचा नर्सिंग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. कविता गुप्ता, डॉ. कविता बक्षी, डॉ. अजय अंबादे, डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. सचिन गाथे, डॉ. मोहित झामड यांनी परिचारिकांना मार्गदर्शन केले.
 


मधुमेहामुळे हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्वासारखे विकारात वाढ होत आहे. मधुमेह "सायलेंट किलर' बनला आहे. मधुमेहाची बाधा होऊनदेखील शेवटपर्यंत रुग्णाला या रोगाबाबत माहिती होत नाही. यामुळेच परिचारिकांना या आजाराबाबत एज्युकेटर बनवून वेळीच उपचार करण्यात आल्यास मधुमेहाच्या दुष्परिणामापासून मुक्ती मिळवण्यास मदत होईल.
-डॉ. सुनील गुप्ता, मधुमेहतज्ज्ञ, नागपूर.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT