101
101 
विदर्भ

डायल १०१ ठरतेय कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी

विवेक मेतकर

अकोलाः कस्टमर केअर म्हटलं की, साधारणतः मृदू भाषेत संवाद साधणारी व्यक्ती. आपल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न याद्वारे केल्या जातो. मात्र, अग्निशमन दलाचा हेल्पलाईन क्रमांक १०१ वर वारंवार दूरध्वनी करत काही घटकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्योग सुरू केला आहे. यामुळे अग्निशमन दलातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

मदतवाहिनीवर संपर्क साधण्याची मोफत व्यवस्था असल्याने दररोज थोडेथोडके नव्हे, तर तब्बल पाचशे दूरध्वनी येतात. त्यातील केवळ पाच ते दहा कामाचे असतात. उर्वरित बहुतेक दूरध्वनींचा केवळ त्रास देण्याचा उद्देश असल्याने येथील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे.

अशा प्रकारे सातत्याने त्रास देऊन असुरी आनंद घेणाऱ्यांची तक्रार अग्निशमन दलाने अनेकदा पोलिसांकडे केली. परंतु, त्यावर कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अहोरात्र तत्पर असणारे हे दल स्वत: हतबल झाले आहे.

आगीच्या घटना, नैसर्गिक आपत्ती वा तत्सम संकटात मदतीसाठी अग्निशमन दलाशी १०१ क्रमांकावर कोणालाही मोफत संपर्क साधता येतो. एकाचवेळी अनेकांना संपर्क साधता यावा म्हणून दलाने या क्रमांकाच्या तीन स्वतंत्र वाहिन्या कार्यरत ठेवल्या आहेत. या दलाच्या मुख्यालयात कार्यरत नियंत्रण कक्षात दूरध्वनीवरून येणाऱ्या तक्रारींवरून तत्परतेने आवश्यक ती कार्यवाही केली जाते. मात्र, अशा कॉल्समुळे लाईन व्यस्त राहते. गरजू व्यक्तीला मदत मिळण्यास अडचणी येवू शकतात.

संकटसमयी मदतीसाठी पोलिसांच्या १०० या मदतवाहिनीनंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारा १०१ क्रमांक आहे. आपत्कालीन मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या या मदत वाहिनीवर वारंवार दूरध्वनी करत काही घटकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्योग सुरू केला आहे. यामुळे दलातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

या मदत वाहिनीवर येणारे दूरध्वनी विविध प्रकारचे असतात. कोणी रात्री-बेरात्री संपर्क साधून शिवराळ भाषेचा वापर करतात. मटक्याचे भाव विचारण्यासाठी अनेक जण दूरध्वनी करतात. रिचार्ज का झाले नाही, आमच्या ‘बॅलन्स’मधून परस्पर पैसे कसे ‘कट’ केले असे भ्रमणध्वनीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. त्यांना उत्तर देताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. काही महिला गॅस सिलिंडर का आले नाही, याची विचारणा करतात. कोणी केवळ वेळ घालविण्यासाठी गंमत म्हणून या क्रमांकावर संपर्क साधतात. त्रास देण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

पोलिसांकडे तक्रार
संपर्क साधणाऱ्यांशी ‘नमस्कार, अग्निशामक दल’ असा सौजन्यशील सूर लावण्याचा दंडक आहे. आपण नमस्कार केल्यानंतर समोरील व्यक्ती शिव्यांची लाखोली वाहत असल्याने मनस्वास्थ्य बिघडते. नियमित दूरध्वनी करून त्रास देणाऱ्या दूरध्वन करणाऱ्यांची तक्रार पोलीसांकडे केली. संबंधितांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करूनही आजतागायत काही झाले नसल्याची व्यथा दलातील कर्मचाऱ्यांनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT