शिवकुमार  
विदर्भ

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: शिवकुमारच्या बंगल्याची झाडाझडती; धारणी पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) ः दीपाली चव्हाण (Dipali Chavan) आत्महत्याप्रकरणी धारणी न्यायालयाने विनोद शिवकुमार याला सोमवारपर्यंत (ता.२९) पोलिस कोठडी सुनावल्याने धारणी पोलिसांनी आज, रविवारी त्याच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी काल, शनिवारपासूनच तपासाला सुरुवात केली आहे. विविध दिशेने पोलिसांचा तपास सुरू असून त्यात मोबाईल व लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. सोबतच अन्य माहितीसुद्धा गोळा करण्यात येत आहे.

आज, रविवारी दुपारी धारणी पोलिसांचे एक पथक विनोद शिवकुमारच्या चिखलदरा येथील बंगल्याच्या तपासणीकरिता गेले होते. त्यांनी बंगल्याची कसून तपासणी केली. या पथकात मोर्शीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गीते, पोलिस कॉन्स्टेबल सचिन होले यांच्यासह धारणी पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या झडतीत काय हाती लागले याची माहिती मात्र पोलिसांनी सध्या दिलेली नाही. तपासाच्या दृष्टीने आवश्‍यक त्या बाबी तपासण्यात आल्या असून योग्यवेळी माहिती दिली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या पत्रात काही लोक वरिष्ठांचे कान भरत असल्याने आपला त्रास वाढल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे लोकं कोण आहेत, याचा शोधसुद्धा धारणी पोलिस घेत आहेत. अशा लोकांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

शिवकुमारची रात्र लॉकअपमध्येच 

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांच्या मृत्यूला शिवकुमार सर्वस्वी जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शिवकुमारला अटक करण्यात आली. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याने शनिवारची (ता. २७) रात्र त्याला धारणी पोलिसांच्या लॉकअपमध्येच राहावे लागले. आणखी एक रात्रसुद्धा त्याला येथेच काढावी लागणार असून उद्या, सोमवारी त्याला परत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सहकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

दीपाली चव्हाण यांना सुसर्दा वनपरिक्षेत्राच्या कार्यालयात वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रात्री श्रद्धांजली वाहिली. या वेळी वनविभागाच्या महिला कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT