workshop sakal
विदर्भ

Heat Waves : उष्मालाटेच्या पूर्व तयारीसाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज; एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

वाशीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने उष्मालाटेबाबत एक दिवसीय कार्यशाळा वाकाटक सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

वाशीम - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने उष्मालाटेबाबत एक दिवसीय कार्यशाळा वाकाटक सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विविध विभागासह स्वयंसेवी संस्थांची उपस्थिती होती.

कार्यशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे हे होते. तर उद्घाटक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वि.घुगे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, वाशीमचे तहसीलदार निलेश पळसकर, मालेगाव तहसीलदार दिपक पुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी पराग राठोड, यांची उपस्थिती होती.

सदर कार्यशाळेला राज्य स्तरावरील व्याख्याते म्हणून डॉ. योगश्री सोनवणे, डॉ. प्रविणकुमार, निलेश मानकर यांची उपस्थिती होती. सदर कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वि. घुगे यांनी केले. कार्यशाळेमध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले.

उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. याबाबत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो कैलास देवरे, भोसले , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी भेटी दिल्यात.

या कार्यशाळेत व्याख्याते म्हणून डॉ. योगश्री सोनवणे यांनी उष्णतेच्या लाटेची पूर्वतयारी कशी करावी या संबंधित मार्गदर्शन केले. तसेच, उष्णतेशी संबंधित आजारांचे होणारे सर्वेक्षण, उष्णतेसंबंधित घ्यावयाची काळजी, उष्णतेशी संबंधित सामान्य प्रथमोपचार, पर्यावरणपूरक हरित आणि पायाभूत सुविधा पोहचविण्याबाबत व उन्हाळ्यात अन्नासंबंधित घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. सदर कार्यशाळेला महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग आदी विभागातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

सदर कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, सहाय्यक अधीक्षक अनिल घोडे, महसूल सहाय्यक विनोद मारवाडी, श्रीकांत वडोदे, मारोती खंडारे, गजानन मेसरे, अमोल काळे एनसीसी अधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT