Disputes among disadvantaged Bahujan front leaders 
विदर्भ

आंबेडकरांच्या बंगल्यावरच ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एकीकडे जिल्हा परिषद निवडणूकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे. तर वंचित बहुजन आघाडीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तिकिट वाटपावरून अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणारे रविवारी हाणामारीत पर्यावसन झाले. तिकिट कापल्याचा रोष व्यक्त करीत दोन पदाधिकाऱ्यांची अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कृषी नगरातील बंगल्यासमोरच हाणामारी झाली. या घटनेची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.


जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यावरून वंचित बहुजन आघाडीत खदखद सुरू आहे. पक्षाविरोधात बंडखोरी करीत अपक्ष तर काहींनी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी दाखल केली. या बंडखोरीची परिणाम पक्षाच्या कामगिरीवर होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक समिती नेमली. समितीने काहींची मनधरणी करण्यात यश मिळविले. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याचा रोष कमी होताना दिसत नाही. हा रोष रविवारी पुन्हा उफाळून आला. त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.

नेमके काय घडले?
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व पूर्वाश्रमीच्या भारिप बहुजन महासंघात सम्राट सुरवाडे पंचविस वर्षांपासून कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. हक्काचा मतदारसंघात त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षनेत्यांचा विश्वास असल्यानंतरही केवळ काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मिळू न दिल्याचा संशय त्यांना होता. या नैराश्‍येतूनच रविवारी त्यांचा एका पदाधिकाऱ्यासोबत वाद झाला व त्यातूनच हाणामारी झाल्याची माहिती आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT