विदर्भ

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या घरी जाणार प्रशासन

मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्यात कोविड-19 (Corona virus) या महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या अनाथ बालकांची (Orphan children) काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण संरक्षणाकरिता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल (District action force) गठित करण्यात आले. या अंतर्गत आता प्रशासन थेट कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या घरी जाणार आहे. (District action force for orphan children due to corona in Gadchiroli)

जिल्हास्तरीय कृतिदलाची बैठक जिल्हाधिकारी सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला सचिव जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांचे प्रतिनिधी, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलिस विभागाचे प्रतिनिधी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष तसेच कृती दलाचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यात कोविड या महामारीमुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला अशा कुटुंबातील बालकांची यादी कृतिदलासमक्ष ठेवण्यात आली.

याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी या अनाथ, निराधार, निराश्रित बालकांच्या घरी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित बालकांना व त्यांच्या कुटुंबांना तातडीने कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, याबाबतचा अहवाल तातडीने कृतिदलास सादर करण्याचे निर्देशित केले. तसेच या बालकांना अन्न, धान्य, आरोग्य सुविधा, कायदेविषयक सुविधा, समुपदेशन सुविधा तसेच त्यांना महिला व बालविकास विभागाच्या तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या. अशा बालकांच्या बाबतीत शासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सिंगला यांनी सूचित केले.

या कामकाजाच्या अनुषंगाने तालुकानिहाय समित्यांचे गठण करण्यात आले असून या समितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविड महामारीमुळे अनाथ, निराधार, निराश्रित झालेल्या बालकांना आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी मदत हवी असल्यास तातडीने चाइल्ड लाइन टोल फ्री क्रमांक 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

अफवावर विश्वास ठेवू नका

कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याबाबत कोणतेही निर्देश शासनामार्फत सध्या प्राप्त झालेले नाहीत. सामाजिक माध्यमांतून फिरत असलेला मदतीविषयीचा संदेश चुकीचा असून कोणत्याही व्यक्तींनी यास बळी पडू नये अथवा नागरिकांनी या बाबतीत कोणत्याही कार्यालयात चौकशी करू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

(District action force for orphan children due to corona in Gadchiroli)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी, शरद पवारांना दिली होती सोडचिठ्ठी

मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, भाजपचे नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर विजयी; आतापर्यंत कुणी मारली बाजी?

Kolhapur Election Breaking News : सतेज पाटलांना तगडा झटका, हायव्होल्टेज लढतीत शारंगधर देशमुख विजयी; महायुतीचा सर्व जागांवर विजय

Pune Municipal Corporation Election Results : पुण्यात पहिल्या निकालात भाजपने मारली बाजी; तीन उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला एक जागा

Nagpur Municipal Election Results 2026 : नागपूर महापालिकेचे पहिले कल समोर, भाजपची मुसंडी, तब्बल ६५ जांगावर आघाडी

SCROLL FOR NEXT