मनोहर पाऊणकर  
विदर्भ

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पाऊणकर यांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी बुधवारी (ता. 4) मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश घेतला. पाऊणकर हे भद्रावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, अचानक त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभेसाठीही त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात संपर्कही वाढविला होता. मात्र भद्रावती मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्यात ते विजयी झाले. धानोरकर आता आपल्या पत्नीला रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाऊणकर यांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. येत्या निवडणुकीत ते शिवसेनेकडून मैदानात राहू शकतात. राज्यात सर्वत्र पक्षप्रवेशाचे पीक उगवले असताना आता चंद्रपुरातील पाऊणकर या ज्येष्ठ कॉंग्रेसी नेत्याने शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींचे प्रयत्न निष्फळ! MK Stalin त्यांच्या भूमिकेवर ठाम; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दिला पाठिंबा

कॉमेडियन भुवन बामवर विरोधात गुन्हा दाखल, स्टेजवरील 'त्या' कृतीने उडाली खळबळ, नेमकं काय घडलं?

India vs China : चीनला दोनदा पराभूत करणाऱ्या भारतीय मुलींच्या आंतरराष्ट्रीय विजयाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून विशेष कौतुक

Gangapur Accident: बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी पतीनेही घेतला अखेरचा श्वास

NDA : पुण्यात एनडीएच्या १५१ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात; १,२५० छात्र सहभागी, ३६४ जण अधिकारी पदवीधर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT