DNA test of mother and father in Amravati 
विदर्भ

अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आई, वडिलांची डीएनए चाचणी; इर्विन रुग्णालयात घेतले नमुने

संतोष ताकपिरे

अमरावती : न्यू प्रभात कॉलनी येथील सव्वा महिन्याच्या बाळाच्या हत्येप्रकरणी राजापेठ पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आईसह वडिलांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी सोमवारी आई नम्रतासह तिच्या पतीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

२९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर घटनेच्या दिवशीच अपहरण आणि मृतदेह आढळल्यावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद राजापेठ पोलिसांनी घेतली. घटनेच्या पाच दिवसांनी पोलिसांनी बाळाच्या आईस अटक केली. ती मंगळवारपर्यंत (ता. आठ) पोलिस कोठडीत आहे.

पहिल्या दिवशी जे बयाण आईने राजापेठ पोलिसांपुढे दिले होते, त्याच बयाणावर सोमवारपर्यंत (ता. सात) ठाम होती. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे व संशयाच्या आधारे तिला अटक केली, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. मंगळवारी पुन्हा नम्रतास न्यायालयासमोर हजर केले जाईल. याप्रकरणाचा पोलिसांना अत्यंत बारकाईने तपास करावा लागत आहे.

आठ दिवसांपूर्वी घराच्या आवारात ही घटना घडली होती. घटनेच्या वेळी घरात केवळ आई, सव्वा महिन्याचे बाळ आणि तिचा लहान भाऊ असे तिघे होते. तपासाच्या आघारे पोलिसांनी बाळाच्या आईला अटक करून तिची पोलिस कोठडी घेतली. रविवारी घटनेच्या आठव्या दिवशी सुद्धा तपासाला आवश्‍यक ती दिशा मिळाली नव्हती.

घटनेनंतर सहा ते सात दिवसाचा कालावधीत ती कुटुंबीयांच्या संपर्कात होती. तोच धागा धरून राजापेठ पोलिस तपास करीत आहेत. तीस सेकंदासाठी सदर महिला बाथरुममध्ये गेली. तेवढ्यात वेळात बेडरुममधील मुल बाहेर काढताना, त्याचा थोडाही आवाज कुणाच्याही कानावर कसा पडला नाही. समोरचे लोखंडी गेटही कुणीच उघडले नसताना कोण आत घुसले व मुलाला उचलून विहिरीत फेकले, हे कोड पोलिसांना अद्याप उलगडता आलेले नाही. 

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT