DNA test of Skeleton found in yavatmal
DNA test of Skeleton found in yavatmal  
विदर्भ

यवतमाळ मानवी कवटी प्रकरण; मृतदेहाच्या डीएनए अहवालानंतर उलगडणार रहस्य

सूरज पाटील

यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यामागील परिसरात बुधवारी (ता. दोन) मानवी कवटी व कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. नातेवाइकांनी मृताचे कपडे ओळखले. मात्र, तो मृतदेह त्या व्यक्तीचा आहे की नाही, हे स्पष्ट झाले नाही. मृतदेहाचे नमूने "डीएनए'टेस्टसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिंक लॅब) पाठविण्यात आले आहेत.

अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले. श्‍वानपथकालाही लगेच पाचारण करण्यात आले. श्‍वानाने दारव्हा मार्गावरील एका लॉजमागील बाजूपर्यंत माग काढला. लॉजच्या मागील बाजूस झाडाला गळफास लावून व्यक्तीने आत्महत्या केली. 

मृतदेह कुजल्याने केवळ कपडेच शिल्लक होते. सदर व्यक्तीच्या अंगावर असलेले कपडे सुनील घनबहादूर (वय 50, रा. वरूड जऊळका, जि. अकोला) यांचे असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सदर व्यक्ती बियाणे कंपनीत विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. सुनील घनबहादूर यवतमाळ येथे 16 ऑक्‍टोबरलाच आले होते. तेव्हापासून ते लॉजमध्ये वास्तव्यास होते. 

सहा नोव्हेंबरपासून त्यांचा नातेवाइकांशी संपर्क तुटला होता. दरम्यान, पुतण्या आकाश घनबहादूर याने मिसिंगची तक्रार पोलिसांत दिली होती. बुधवारी मृतदेह आढळून येताच ओळख पटविण्यासाठी नातेवाइकांना बोलावण्यात आले. पुतण्याने कपडे ओळखले. मात्र, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा आहे की नाही, हे रहस्य आहे. 

ओळख पटविण्यासाठी नमूने नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले तर, कवटी राखून ठेवली असून, चंदीगढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यवतमाळ शहराचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी दिली. रिपोर्ट यायला चार महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो, असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांनतरच मृतदेह कोणाचा याचा उलगडा होणार आहे.

मृतदेहाचे नमूने डीएनए टेस्टसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नातेवाइकांनी कपडे ओळखले. मात्र, रिपोर्ट आल्यानंतरच तो मृतदेह कुणाचा हे स्पष्ट होईल.
- माधुरी बाविस्कर, 
उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT