do not make misunderstanding over prayer temple of Tukdoji maharaj  
विदर्भ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थना मंदिराचा वाद निरर्थक; शांतता राखण्याचे गुरुदेव भक्तांचे आवाहन 

संदीप राऊत

मोझरी (जि. अमरावती) :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थना मंदिराचा वाद दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये नाहकच काही मंडळींकडून गुरुकुंज आश्रमाचा उद्धार करण्यात येत आहे. वास्तविक पाहता तुकडोजी महाराज हे परिवर्तनवादी संत होते. त्यामुळे त्यांनी कधीही त्यांच्या कोणत्याही वस्तूचा किंवा वास्तूचा संग्रह करण्याची मनीषा बाळगली नाही. काळानुरूप प्रत्येक गोष्टीत परिवर्तन घडवून तेथे नवनिर्माण कार्य व्हावे, हे महाराजांनाही अपेक्षित होते. तेव्हा त्याच कार्याची पूर्तता अ. भा. श्री गुरुदेव सेवामंडळाकडून होत आहे. त्यामुळे अशा कार्याला विरोध करणे ही खरी गुरुदेव भक्‍ती होणार नसल्याचे मत गुरुकुंज मोझरीवासींकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे, नवीन मंदिर हे आश्रम परिसरातच उभारण्यात आले असून हा संपूर्ण परिसरच महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला आहे. जुन्या मंदिराच्या भिंतींना तडे गेल्याने तसेच ध्यान प्रार्थना करणाऱ्या भक्तांसाठी मंदिरांची आसनक्षमताही कमी असल्याने नवीन मंदिर निर्मिती अगत्याचे होते, यात शंकाच नाही. परंतु मुद्दा आहे जुने मंदिर पाडण्याचा. 

येथेच काही गुरुदेव भक्तांच्या भावना अनावर होत आहेत. परंतु भविष्यात जीर्ण झालेल्या मंदिरामुळे महाराजांच्या पावन आश्रमात एखादी अनुचित घटना घडली तर ती कोणत्याच गुरुदेवभक्ताला सहन होणार नाही. त्यामुळे या नवनिर्माण कार्याचे सर्व गुरुदेवभक्तांनी साक्षीदार होऊन नाहक उद्‌भवलेल्या वादावर पडदा टाकावा, असे मत परिसरातील गुरुदेभक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

एवढ्या वर्षांत गुरुदेव सेवा मंडळाकडून आश्रमचा काहीच विकास करण्यात आला नाही, असे देखील काही लोक म्हणतात. परंतु विकासाला सुरुवात होताच आपल्याच लोकांकडून जेव्हा बाधा येते त्यावेळी अतीव दुःख होते. 
-निर्मला उमप, 
अध्यक्ष, मंजुळामाता भजन मंडळ मोझरी. 

गुरुकुंज आश्रमातील मंदिरच नव्हे तर येथील प्रत्येकच वस्तूसोबत गुरुदेवभक्तांची आस्था जुळलेली आहे. तेव्हा आपण प्रत्येकच गोष्टीचं जतन करू लागलो तर नवीन कार्याला उभारीच मिळणार नाही व तसेही परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. 
- संजय लांडे, 
सचिव, राष्ट्रसंत बहूद्देशीय संस्था मोझरी. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT