संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

आरोग्य केंद्रात डॉक्‍टर सापडेना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ चौकातील आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून डॉक्‍टर नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने एकीकडे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचे प्रवेश थांबले आहेत. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांनाही मोठा फटका बसतो आहे.

विद्यापीठाचे आरोग्य केंद्र नेहमीच विविध कारणांमुळे प्रकाशझोतात असते. यापूर्वीच केंद्रात महागडी उपकरणे आणून ठेवली असताना, त्याचा उपयोग होत नसल्याची बाब मार्च महिन्यात झालेल्या सिनेट सभेत सदस्यांनी आरोग्य केंद्राच्या प्रश्‍नाला धरून कुलगुरूंना चांगलेच घेरले होते. ऍड. मनमोहन वाजपेयी यांनी या केंद्रात तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्याची बाब उघडकीस आणली होती. यावर एक विशेष समिती नेमून आरोग्य केंद्रातील सर्व प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिले होते. मात्र, यातील एकही प्रश्‍न सुटला नसल्याचे चित्र आहे. केंद्रात असलेल्या डॉक्‍टर दीड महिन्यापूर्वी वारांगल येथे नोकरी सोडून गेल्याचे समजते. त्यामुळे आता आरोग्य केंद्र अटेंडंटच्या भरवशावर चालत आहे. मात्र, विद्यापीठाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नाही. सध्या पावसाचे दिवस असल्याने साथरोगांचे थैमान आहे. अशा दिवसांमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक असताना डॉक्‍टर नसल्याने तेही मिळणे कठीण झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि प्रवेशाचा प्रश्‍न असताना त्यावर निर्णय घेण्यास विद्यापीठ उशीर करीत असल्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.
ऑगस्टच्या शेवटी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबद्दलची मान्यता घेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतरच नव्या डॉक्‍टरची नेमणूक केली जाईल. सध्याची परिस्थिती बघता तात्पुरती सोय करणे गरजेचे असले, तरी त्याबद्दल कुलगुरूच निर्णय घेतील.
-डॉ. नीरज खटी,
प्रभारी कुलसचिव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT