Doctor Smita deshmukh from Amravati got Indian students Council Savitri Award
Doctor Smita deshmukh from Amravati got Indian students Council Savitri Award  
विदर्भ

इंडियन स्टुडंट्स कॉन्सिलचे सावित्री पुरस्कार जाहीर; शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख ठरल्या मानकरी

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) :  इंडियन स्टुडंट कौन्सिल च्या वतीने क्रांतीज्योती सावित्री बाई फुले, सावित्री उत्सवा निमित्त दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा डॉ.ज्ञानोबा कदम यांनी केली असून शिवाजी महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांना सावित्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतात परिवर्तनवादी चळवळीचे नेतृत्व केले व महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण व सक्षमीकरणसाठी कॢतिशील प्रयत्न केले फुले दांपत्याचा हा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तसेच  सामाजीक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने या वर्षीपासुन सावित्री पुरस्कार देण्यात येत आहेत.यावर्षी विविध संस्था व संघटनांनी सादर केलेले होते.त्यातील निवडक महिलांची निवड पुरस्कार निवड समितीने केली असून एकुण सात पुरस्कार दिले जाणार आहेत.

यामध्ये अमरावतीच्या डॉ.स्मिता देशमुख श्री. शिवाजी कला आणि वाणिज्य महा विद्यालयात प्राचार्ये म्हणून २३ काम पाहत आहेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, प्रबोधनाने कलाक्षेत्राला प्रोत्साहन देणारे  व्यक्तीमत्व म्हणून त्या  सुपरिचित आहात. व त्यांचे मोठे नाव आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत इंडियन स्टुडन्ट कौन्सिलचा यावर्षीचा राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार देण्यात येणार आहे.

वरील सर्व सावित्री पुरस्काराची निवड इंडीयन स्टुडंटस कौन्सिल च्या राज्य कार्यकारिणी बैठीकत निर्णय घेऊन जाहीर करण्यात आले. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज्ञानोबा कदम ,कार्यवाह मयुरी कुंभार , प्रा. माधुरी राऊत ,डॉ. सुनीता क्षिरसागर, विश्वजीत घाटविसावे,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या महिलांचा होईल पुरस्काराने गौरव

विद्याताई चव्हाण ,अभिनेत्री स्पुहा जोशी, डॉ.श्रदधा कुंभोजकर व डॉ.मंजुश्री जयसिंगराव पवार, प्राचार्या डॉ.मिता रामटेके , प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक व प्राचार्या डॉ.स्मिता देशमुख, यासर्व सावित्रीच्या लेकीचा सावित्री पुरस्काराने 31 जानेवारी रोजी पुणे येथील फुलेवाडा याठिकाणी गौरव करण्यात येणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT