doctor Suicide Suffering From Troubled by Wife
doctor Suicide Suffering From Troubled by Wife 
विदर्भ

पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्‍टरची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाईकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वुड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी डॉक्‍टर पत्नीसह तिघांवर आता गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सागर मोरघडे हे मुळचे सावंगी मेघे (जि. वर्धा) येथील राहणारे होते. ते यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात लहान मुलांचे डॉक्‍टर म्हणून कार्यरत होते. वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांची राधानगर, नरसाळा येथील कोमल नावाच्या तरुणीशी ओळख झाली. त्यावेळी कोमल ही सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेत होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोन वर्षांपूर्वी त्यांचे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. डॉ. सागर मोरघडे हे स्वछंदी स्वभावाचे होते. कधी कधी ते मित्रांसोबत मद्य देखील प्राशन करीत होते. मात्र, डॉ. सागर मद्य पित असल्याने हा प्रकार डॉ. कोमलला खटकत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे लग्नानंतर काही दिवसातच डॉ. कोमल ही सागरला सोडून आपल्या माहेरी निघून गेली. तेव्हापासून डॉ. सागर हे एकटेच राहत होते. त्यातच कोमलच्या माहेरची मंडळी आशिष मुकुंदराव तोडकर (33), मनिषा मुकुंदराव तोडकर (राधानगर, नरसाळा) हे डॉ. सागरच्या वागण्यावर दडपण आणत होते. त्याचप्रमाणे तिघेही मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून 26 एप्रिलला सकाळी 11 च्या सुमारास डॉ. सागर यांनी आपल्या घरी सिलिंग पंख्याला ओढणी बांधून गळफास लावला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासात डॉ. कोमल आणि तिचे नातेवाईक आशिष व मंजुषा हे दोषी आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

प्रेमाचा करूण अंत :
डॉ. सागर आणि डॉ. कोमल हे दोघेही एकेकाळी वैद्यकीय शिक्षण घेत होते. दोघांचे सूत जुळल्यानंतर सागरचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते. कोमलसाठी काहीही करण्यास तयार असलेल्या सागरने लगेच कुटूंबियांशी चर्चा करून लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शेवटी त्याच कोमलने पतीचा घात केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT