विदर्भ

कोरोनाकाळात डॉक्टरांनी सोडली साथ; आरोग्य यंत्रणेपुढे समस्या

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : वाढत्या कोरोना (coronavirus) संकटात चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेपुढे आता नवी समस्या उभी ठाकली आहे. कोविड रुग्णालयातील ९० आंतरवासी डॉक्‍टरांनी (Doctors) प्रलंबित मागण्यांना (Pending demands) घेऊन संप पुकारला आहे. सोमवारपासून या संपाला सुरुवात झाली आहे. मानधनासह अन्य मागण्यांना घेऊन कोविड रुग्णालयातील आंतरवासी डॉक्‍टरांनी हा संप पुकारला आहे. (doctors on strike at covid Hospital in Chandrapur district)

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २०१६ च्या पहिल्या तुकडीचे सर्व ९० उत्तीर्ण डॉक्‍टर्स अलीकडेच शासकीय कोविड सेवेत रुजू झाले आहेत. नव्यानेच रुजू झालेल्या या आंतरवासी डॉक्‍टरांना केवळ अकरा हजार रुपये मानधन दिले जात आहे. सध्या कामात जोखीम जास्त आहे. त्यामुळे मानधन पन्नास हजार रुपये करण्याची मागणी आंतरवासीत डॉक्‍टर संघटनेने केली आहे.

मुंबई, पुणे आणि अन्य काही ठिकाणी आंतरवासी डॉक्‍टरांना कोविड सेवेसाठी ५० हजार रुपये मानधन निश्‍चित झाले आहे. मात्र, त्याची चंद्रपुरात अद्याप अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पन्नास हजार रुपये मानधनाची मागणी चंद्रपुरात लागू करण्याची आंदोलक डॉक्‍टरांची मागणी आहे.

मानधनासोबतच डॉक्‍टरांचा विमा काढणे, कोरोना लागण झाल्यास बेड राखीव ठेवणे, विलगीकरणासाठी स्वतंत्र इमारतीची सुविधा करणे या मागण्याही आंतरवासीत डॉक्‍टर संघटनेने प्रशासनापुढे ठेवल्या. मात्र, त्याची अद्याप अमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रलंबित मागण्यांना घेऊन आंतरवासीत डॉक्‍टर संघटनेच्या नेतृत्वात ९० डॉक्‍टरांनी संप पुकारला आहे.

संपाने रुग्णसेवा प्रभावित

संपाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. पुढील पाच दिवसांच्या संप काळात यावर निर्णय न झाल्यास महिनाभरात मोठा निर्णय घेणार असल्याचा निर्णय आंतरवासीत डॉक्‍टर संघटनेने घेतला आहे.

(doctors on strike at covid Hospital in Chandrapur district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT