leopard sakal
विदर्भ

बिबट्याच्या तावडीतून कुत्र्यांनी वाचविले महिलेचे प्राण

बिबट्याने अचानक हल्ला केलेल्या महिलेच्या मदतीला २ कुत्रे धावत आले असून त्यांनी बिबट्याला पिटाळून लावत या महिलेचे प्राण वाचविले.

सकाळ वृत्तसेवा

बिबट्याने अचानक हल्ला केलेल्या महिलेच्या मदतीला २ कुत्रे धावत आले असून त्यांनी बिबट्याला पिटाळून लावत या महिलेचे प्राण वाचविले.

धानोरा (जि. गडचिरोली) - बिबट्याने अचानक हल्ला केलेल्या महिलेच्या मदतीला २ कुत्रे धावत आले असून त्यांनी बिबट्याला पिटाळून लावत या महिलेचे प्राण वाचविले. प्रेमीला श्यामराव किरंगे, असे जखमी महिलेचे नाव आहे.

उत्तर धानोरा परीक्षेत्रातील मुस्का उपक्षेत्रात बांधोना गावातील प्रेमीला किरंगे शुक्रवार (ता. १) सकाळी ६ वाजताच्या सुमारास शौचाकरिता जंगलात गेली असता जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या महिलेवर हल्ला केला. महीलेने प्रतीकार केला व सोबत असलेले २ कुत्रे बिबट्यावर तुटुन पडले. त्यामुळे महिलेला सोडून बिबट जंगलात पळून गेला.

कुत्र्यांमुळे प्रेमीला किरंगे या महीलेचे प्राण वाचले. वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत मेडेवार, क्षेत्र सहाय्यक मुस्का करेवार, वनरक्षक प्रवीण मेश्राम, विकास कुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस करून उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र आरमोरी येथे हलविले. परंतु महिला गंभीर स्वरूपात जखमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले. जखमी महिलेस वनपरीक्षेत्र अधिकारी वसंत मेडेवार यांनी उपचाराकरीता मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या समित्यांच्या बैठकीत चहापानावर लाखोंचा खर्च; निविदेविना बिले मंजूर होत असल्याचे उघड

Pune News: ईडब्ल्यूएस संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा; ‘अमृत’कडून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT