file photo
file photo 
विदर्भ

"डोनेट युवर बुक'ला अनेकांची साथ

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सकाळ व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या सहकार्याने आयोजित "डोनेट युवर बुक'ला जिल्ह्याच्या विविध भागांतून मदतीचा ओघ वाढला आहे. चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यंदा महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांनी या मोहिमेत मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळच्या डोनेट युवर बुकला पहिल्या वर्षापासून मदत करणाऱ्या उच्चशिक्षिक पल्लवी रमेशराव हाडे हिने यंदासुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. अमरावतीच्या शेगाव रोडवरील भाग्योदय कॉलनीतील रहिवासी पल्लवी हाडे ही डबल एम.ए. असून तिने डीएड व बीएड सुद्धा केले आहे. आपल्या वाढदिवशी मिळणाऱ्या रकमेतून ती गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या व अन्य शालेय साहित्य घेते व सकाळच्या उपक्रमात गरीब विद्यार्थ्यांना देते. यंदाची मदत तिने सकाळ कार्यालयात आणून दिली.
"सकाळ'ने सुरू केलेल्या उपक्रमामुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत होत आहे. प्रत्येकाने मदत केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यास निश्‍चित मदत होईल, असे डॉ. शरद देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT