विदर्भ

ठरलं...एसएनडीएलची बत्ती गुल

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : सर्वांचा विरोध झुगारून वीज वितरणचे खासगीकरण करण्याचा केलेला प्रयोग फसला असून शहरातील एसएनडीएलचे क्षेत्र महावितरणकडून आपल्या ताब्यात घेणार आहे. तसे एसएमएस शनिवारीच वीजग्राहकांच्या मोबाईलवर धडकले आहेत.
रविवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे संचालक (संचालन) दिनेश साबू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत अधिकृत निर्णय होणार असून तत्पश्‍चातच अधिकृत घोषणा होणार आहे. या संदर्भात शनिवारच्या घडमोडी लक्षात घेता ही घोषणा केवळ औपचारिकताच असेल.
एसएनडीएल हद्दीतील वीजयंत्रणेचा ताबा घेण्यासाठी महावितरणने तयारी पूर्ण केली आहे. त्यातच शनिवरी सकाळी वीजग्राहकांना तडकाफडकी एसएमएस पाठवून महावितरणने यंत्रणा ताब्यात घेतल्याची सूचना देण्यात आली. दुपारी नव्याने एसएमएस पाठविण्यात आले. त्यात जुन्या एसएमएसकडे दुर्लक्ष करा, रविवारी मध्यरात्री यंत्रणा ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती त्यात नमूद होती. दोन्ही एसएमएस संदर्भात अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता प्रत्येकाचे कानावर हात आणि तोंडावर बोट होते. प्रायोगिक तत्त्वावर एसएमएस पाठवून पडताळणी करण्यात आल्याचे काहींनी सांगितले. दुसरा मेसेजही त्याच प्रकारचा असल्याचा सूत्रांचा दावा आहे. पण, या प्रकारावरून महावितरणने एसएनडीएलकडून ग्राहकांचे संपर्क क्रमांक हस्तगत केले असल्याचे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT