संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

दानदाताच विद्यापीठाकडून उपेक्षित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आर्थिक मदतीसह 78.04 एकर जमीन दान देणारे महान दानदाता रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांचाच विसर विद्यापीठाला पडलेला दिसतोय. 2013 साली त्यांचे नातू अनंत कामठीकर यांनी त्यांच्या नावावर "टपाल तिकीट' आणि रविनगर चौकाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर विद्यापीठाकडून कुठलीच हालचाल केली नसल्याचे समजते.
नागपूर विद्यापीठाची स्थापना 1923 साली करण्यात आली. त्यावेळी अल्पशा जमिनीची मालकी असलेल्या विद्यापीठाकडे विद्यार्थी बसविण्याची व्यवस्था पुरेशी नव्हती. त्या काळी 1936 साली कामठीचे रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांनी 35 लाख 20 हजार 540 रुपये आणि 78.04 एकर जमीन दान केली. या जमिनीवर 1940 साली त्यांच्याच नावाने देशातील पहिली तांत्रिक संस्था उभारण्यात आली. यानंतर इतर जमिनीवर विद्यापीठाचा विस्तार करण्यात आला. डी. लक्ष्मीनारायण यांच्या दातृत्वाची आठवण म्हणून त्यांच्यावर एक टपाल तिकीट निघावे, तसेच रविनगर चौकाचे नामकरण डी. लक्ष्मीनारायण यांच्या नावावर व्हावे अशी इच्छा त्यांचे नातू तत्कालीन सिनेट सदस्य अनंत कामठीकर यांनी 2013 साली केली होती. यासाठी सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेत एकमताने प्रस्ताव मान्य केला होता. तसेच लवकरात लवकर हे कार्य पूर्णत्वास नेण्याची ग्वाही विद्यापीठाकडून देण्यात आली होती. शिवाय चौकाच्या नावासाठी मनपाला पत्र देण्याचेही ठरले. मात्र, सहा वर्षांचा कालावधी उलटूनही हे कार्य पूर्णत्वास नेण्यात विद्यापीठाकडून कुठलीच कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे याबद्दल दोनदा स्मरणपत्र देत, खुद्द कामठीकर यांनी त्याची आठवण करून दिली. मात्र, नेमका हा प्रस्ताव आहे कुठे, हेच विद्यापीठाला ठाऊक नाही.
डी. लक्ष्मीनारायण यांचे कार्य खरोखरच मोठे आहे. त्यांच्या नावावर टपाल तिकीट आणि चौकाचे नामकरण करण्यासंदर्भातील प्रस्तावावर विद्यापीठाकडून नेमकी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती मंगळवारी घेऊन पाठपुरावा करण्यात येईल.
- डॉ. नीरज खटी, प्रभारी कुलसचिव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT