विदर्भ

Vidhan Sabha 2019 : विजयानंतर शिवसेनेला विसरू नका

सकाळ वृत्तसेवा

मौदा : शिवसेनेचे कार्यकर्ते युती धर्म निभवणार आहेत. मात्र, भाजप उमेदवाराने दिलेला शब्द पाळला पाहिजे; तरच मदत करू, असे शिवसेनेने ठरविल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी शिवसेनेकडून काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन भाजपच्या उमेदवाराने दिले आहे.शुक्रवारी मौदा येथे गोडबोले यांच्या निवासस्थानावर महायुतीच्या सभेत शिवसेनेच्या वतीने काही अटी टाकण्यात आल्या. कामठी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी शिवसेना प्रचार करेल; पण त्यापूर्वी शिवसनेनेच्या अटी मान्य कराव्यात, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला. यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक समितीमध्ये स्थान द्यावे व प्रमुख निर्णयात सहभागी करावे अशी मागणी करण्यात आली.यापूर्वीचा अनुभव चांगला नसल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत नाराजी असल्याचे भाजपच्या उमेदवाराला सांगण्यात आले. येणाऱ्या काळात शिवसेनेच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात येईल व सर्व निर्णयामध्ये शिवसेनेला सहभागी केले जाईल, समितीमध्ये पदे दिली जातील, असा शब्द महायुतीच्या उमेदवाराने दिला. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत एकमेकांना मदत करण्याचे ठरले. बैठकीत शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी मौदा येथील धनजोडे सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजप फक्त निवडणुकीपुरतीच शिवसेनेला हाती घेते, नंतर विसरून जाते, असे स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. यामुळे मागील अनुभवामुळे नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना समजाविण्याची भूमिका युतीमधील नेत्यांनी बैठकीत घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या विजयासाठी प्रचार केला होता याचाही उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT