File photo
File photo 
विदर्भ

नक्षल्यांसोबत फिरून जीवन बरबाद करू नका

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : तरुणांनो कष्ट करा आणि स्वतःचे पोट भरा. नक्षल्यांच्या नादी लागून आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका, असे भावनिक आवाहन 20 जुलै रोजी पोलिस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या रूपी ऊर्फ सुशीला नरोटे हिचे वडील महारू नरोटे यांनी केले आहे.
रूपी हिला बालवयातच नक्षल्यांनी आपल्या सोबत बळजबरीने नेले. मात्र, नक्षल्यांनी आम्हाला काहीही विचारले नाही किंवा काही माहितीही नाही. आम्ही तिचे नाव रूपी ठेवले होते तर नक्षल्यांनी तिला सुशीला हे नाव दिले, असेही महारू नरोटे म्हणाले.
नरोटे म्हणाले, नक्षली रूपीला घेऊन गेल्यापासून ती फक्त दोनदा घरी आली. पहिल्या वेळी ती जेव्हा होईंदूर येथे आपल्या राहत्या घरी आम्हाला भेटायला आली तेव्हा मी स्वतः तिला आमच्यासोबत राहा असे सांगून थाटामाटात लग्न लावून, संसार सुरू करून देतो, असे सांगितले. मात्र, तिने काहीही ऐकले नाही. पोलिसांनी आम्हाला आत्मसमर्पण योजनेविषयी माहिती दिली होती. दुसऱ्यांदा जेव्हा रूपी आम्हाला भेटायला आली तेव्हा मी तिला तू नक्षल्यांसोबत फिरणे सोडून दे., तू आत्मसमर्पण कर, आम्ही तुला पोलिसांकडे घेऊन जाऊ असे सांगितले. परंतु, ती काहीही ऐकली नाही. असे झाले असते तर आज तिचा मृत्यू झाला नसता, हे सांगताना महारू नरोटे भावुक झाले होते.
नक्षल्यांमुळे आपली मुलगी मारली गेली. आमचा म्हातारपणाचा आधार गेला, असे सांगताना महारू नरोटे रडू लागले. दलामध्ये गेलेल्या इतर आदिवासी तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल, असे विचारताच त्यांनी नक्षल्यांच्या नादी लागून बहुमोल जीवन बरबाद करू नका, असे आवाहन केले.
नक्षली हे रूपी नरोटेसारख्या आदिवासी मुलींना व मुलांना बालवयातच त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय आपल्या सोबत घेऊन जाऊन त्यांना बळजबरीने नक्षल दलामध्ये काम करण्यास भाग पाडतात, हे महारू नरोटे यांच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले. रूपीने जर तिच्या आईवडिलांचे ऐकले असते तर आज ती आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन जनसामान्यांसारखे सुंदर जीवन जगू शकली असती. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन अशा नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
विकासाच्या मूळ प्रवाहात या
दलामध्ये गेलेल्या आदिवासी तरुणांनी नवजीवन योजनेचा लाभ घेऊन विकासाच्या मूळ प्रवाहात परत येण्यासाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, पोलिस दल त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT