File photo 
विदर्भ

अप्पर वर्धाची दारे कोणत्याही क्षणी उघडणार

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची दारे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्‍यता आहे. धरणांत येणारा पाण्याचा येवा बघता प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी (ता.5) सांयकाळी पाचच्या समुारास धरणांतील जलपातळी 341.85 मीटरवर पोहोचली होती व त्यात 506.38 दलघमी जलसाठा झाला. 342.50 मीटरनंतर दरवाजे उघडण्यात येतील, असे अप्पर वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी सांगितले.
ऑगस्टच्या अखेरच्या सप्ताहात व सप्टेंबरच्या प्रारंभी सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याचा येवा वाढला आहे. सद्य:स्थितीत 236 मीटर प्रतिसेंकद आहे. ही गती बघता जलपातळीची मर्यादा लवकरच गाठण्याची शक्‍यता जलसंपदा अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. अप्पर वर्धा धरणाची पूर्ण संचय पातळी 342.50 मीटर असून गुरुवारी सायंकाळपर्यंत ती 341.85 मीटरपर्यंत पोहोचली. एकूण जलसाठ्याच्या क्षमतेच्या तुलनेत 506.38 दलघमी ( 89.78 टक्के) इतका जलसाठा झाला आहे. त्यामुळे यंदा पाणी पुरवठ्यासह सिंचनाची समस्या निकाली निघाली आहे. रब्बी हंगामात यंदा पूर्ण पाच पाळ्या सिंचन होऊ शकणार आहे.
दरम्यान अप्पर वर्धा धरणातील साठा वाढावा व दरवाजे उघडण्याची प्रतीक्षा अमरावतीकरांना आहे. सप्टेंबरमध्ये धरणांतील जलसाठा शंभर टक्‍क्‍यांवर होईस्तोवर दरवाजे उघडता येत नसल्याने तूर्तास प्रतीक्षा मात्र कायम आहे.
कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारच्या तुलनेत धरणातील पाण्याचा येवा कमी झाला असून सद्य:स्थितीत तो 236 घनमीटर प्रतिसेकंद इतका आहे. जलपातळी वाढत असल्याने खबरदारी म्हणून सिंभोरा ते कौंडण्यपूर व बेनोडा ते दऊरवाडा अशा दोन्ही नदी काठावरील गावांना सकर्ततेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व तहसील, ग्रामपंचायती व पोलिस ठाण्यांना नोटिसेस देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Accident: रुग्णाला नेताना रुग्णवाहिकाच आजारी; रॉड तुटला, भर उन्हात भाजलेल्या रुग्णाच्या वेदनांत भर!

Drowning Incident: खडकीत आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना, सरपण आणायला गेले अन् तिघांचा जीव गेला..

Kolhapur Accident News : डंपर पंक्चर झाला म्हणून थांबला अन्, जिवावर बेतला; समोर जळत होता पण...

Latest Marathi News Live Update: हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

Cancer Treatment Breakthrough : कर्करोगावर क्रांतीकारी बदल, ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ ऐवजी मिळणार ‘इम्युनोथेरपी’; रुग्णांचे आयुष्य वाढणार

SCROLL FOR NEXT