gondia  
विदर्भ

रेल्वे प्रवाशांमध्ये कहीं खुशी, कहीं गम; आकारले जातात दुप्पट तिकीटदर तरीही प्रवास सुरु 

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया  ः कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल 11 महिन्यानंतर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने दुर्ग-गोंदिया- इतवारी ही लोकल रेल्वेगाडी सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी सुरू केली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांत आनंदाचे वातावरण असले तरी, निर्धारित तिकीटापेक्षा दुप्पट भाडे वसूल केले जात असल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च 2020 पासून रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या होत्या. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे पाहून एक्‍स्प्रेस रेल्वेगाड्या कोविड-19 स्पेशल म्हणून पटरीवर आल्या. मात्र, या रेल्वेसेवांचा उपयोग सर्वसामान्यांना प्रवासासाठी करता येत नव्हता. त्यामुळे बहुतांश सर्वसामान्य प्रवाशांना कधी एसटी बस तर, कधी स्वतःच्या वाहनाने येणे-जाणे करावे लागत होते. मध्यंतरीच्या कालावधीत लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. 

या मागणीचा विचार करून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने सोमवारपासून दुर्ग-गोंदिया- इतवारी ही रेल्वेसेवा सुरू केली. रेल्वेसेवा सुरू झाल्याने गोंदियाहून इतवारीकडे रोजगारानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे भाडे दुप्पट केल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे. गोंदिया येथून भंडाऱ्याला जायचे असल्यास पूर्वी 20 रुपये मोजावे लागत होते. 

परंतु, आता याच अंतरासाठी 40 रुपये मोजावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून दोन्ही पादचारी पूल बंद आहेत. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटरचा फेरा मारून प्रवाशांना रेल्वेस्थानक गाठावे लागते. ही समस्या रेल्वे प्रशासनाने ताबडतोब सोडवावी, अशी मागणीदेखील प्रवाशांकडून होत आहे.

अशी धावेल लोकल रेल्वे

08741 दुर्ग-गोंदिया लोकल रेल्वेगाडी दुर्ग येथून सकाळी 6.30 वाजता सुटेल. आमगाव येथे सकाळी 8.37 वाजता पोहोचेल. गोंदिया स्थानकात 9.35 येईल. तसेच 08742 गोंदिया-दुर्ग लोकल रेल्वेगाडी गोंदिया येथून सायंकाळी 5.40 सुटेल. आमगाव येथे सायंकाळी 5.59 पोहोचेल. दुर्ग स्थानकात रात्री 8.20 पोहोचेल. 08743 गोंदिया-इतवारी लोकल रेल्वे गोंदिया येथून सकाळी 9.45 सुटेल. तिरोडा येथे 10.09, तुमसर येथे 10.27, भंडारा येथे 10.45, कन्हान येथे 11.30, कामठी येथे 11.38 व इतवारी येथे 12.30 पोहोचेल. 08744 इतवारी-गोंदिया लोकल रेल्वे इतवारी येथून दुपारी 3 वाजता सुटेल. त्यानंतर सर्व स्थानकात थांबा घेऊन सायंकाळी 5.30 गोंदियात पोहोचेल.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

SCROLL FOR NEXT