dr abhay bang awarded honorary doctorate degree Kaziranga University education gadchiroli sakal
विदर्भ

Doctorate Degree : डॉ. अभय बंग यांना काझीरंगा विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची जगाने दखल घेतली

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : सर्चचे संचालक पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांना आसामच्या काझीरंगा विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे. काझीरंगा विद्यापीठ जोरहाट येथे आयोजित दिक्षांत समारंभात डॉ. बंग यांना या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.

काझीरंगा विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा दीक्षांत समारंभ येत्या ११ जुलैला होणार आहे. या दिक्षान्त समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बंग यांना निमंत्रित केले आहे. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिक्षान्त समारंभ होणार आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तसेच, नवीन उद्योजक, व्यावसायिक विकसित करण्यासाठी २०१२ मध्ये खेतान औद्योगिक समूहाने या विद्यापीठाची स्थापना केली.

आसामच्या जोरहाट या शहरात वसलेले हे विद्यापीठ संपूर्ण ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या खाजगी विद्यापीठांपैकी एक आहे. पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची जगाने दखल घेतली आहे.

न्युयॉर्कच्या टाईम नियतकालीकाने डॉ. बंग यांना ‘ग्लोबल हेल्थ हिरो’चा सन्मान दिला आहे. तर सामाजिक क्षेत्रातला सर्वोच्च मानल्या जाणा-या छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने नुकतेच या दाम्पत्याला गौरविण्यात आले आहे.

गडचिरोलीसारख्या मागास भागात राहून तेथील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या डॉ. अभय आणि राणी बंग यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरतं सीमित न राहता, खेड्यापाड्यांत, देश-परदेशात उपयुक्त ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT