dr satish gogulwar and shubhada deshmukh found corona positive even after taking two dose of vaccination in gadchiroli 
विदर्भ

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग, फेब्रुवारीतच झाले होते लसीकरण

मिलिंद उमरे

गडचिरोली : कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक तथा 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या दोघेही येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचार घेत आहेत.

डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागांतील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था स्थापन करून कार्य करीत आहेत. त्यांचे निवासस्थान व कार्यालय कुरखेडा येथे आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता त्यांनी आधीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. फेब्रुवारी महिन्यातच त्यांचे या लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते. तरीही त्यांना कोरोनाने गाठल्यामुळे लसी क्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. बुधवार (ता. 7) डॉ. गोगुलवार व शुभदा देशमुख यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल गुरुवार (ता. 8) सायंकाळी प्राप्त झाला. अहवालात दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे नमूद होते. त्यानंतर गुरुवारी रात्रीच त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील कोरोना कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

धोका कमी होतो -
यासंदर्भात डॉ. सतीश गोगुलवार यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना संसर्ग झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोघांचीही प्रकृती बरी आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, याची खात्री नाही. मात्र, ही लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यावरही या आजारातून लवकर बरे होण्यास मदत मिळते. कोरोनाचा धोका कमी होतो, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT