Dr Sonal Jaiswal
Dr Sonal Jaiswal Sakal
विदर्भ

बहिणीच्या हळदी समारंभात भावाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चूलत बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या भावाला ऐन हळदीच्या कार्यक्रमात ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू.

श्रीरामपूर, (जि यवतमाळ) - येथील चूलत बहिणीच्या लग्नासाठी (Marriage) आलेल्या भावाला ऐन हळदीच्या कार्यक्रमात (Haldi Event) ह्रदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आल्याने तरुण भावाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना बुधवारी (ता. ६) घडल्याने आनंदाच्या क्षणी जयस्वाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्न म्हटलं की तो अतिशय आनंदाचा क्षण. येथील पायल मुन्ना जयस्वाल श्रीरामपूर व यवतमाळ येथील शुभम जयस्वाल यांचे ता. ७ ला लग्न असल्याने चुलत बहिणीच्या लग्नासाठी कोल्हापूरवरुन न्यू इंडिया इंन्श्यूरन्स कंपनी शाखा, कोल्हापूर येथे व्यवस्थापक असलेले डॉ. सोनल अशोक जयस्वाल (वय - ३६वर्षे) हे आपल्या गावी कुटुंबासह आले होते. बहिणीच्या लग्नानिमित्त तीला लग्नापूर्वीचे कार्य असलेल्या हळदीच्या क्षणी सर्वजण आनंदात असताना त्यांनी बहिणीला साडीचोळीचा आहेर दिल्यानंतर ह्या आनंदाच्या क्षणी डॉ. सोनल यांच्या ह्रदयामध्ये अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. तत्काळ त्यांना पुसद येथील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. मनिष पाठक यांच्या इस्पितळात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

विशेष म्हणजे डॉ. सोनल हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. २०१० मध्ये त्यांच्या वडीलांनाही ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. ७)पुसद येथील हिंदू स्मशानभूमीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई अन्नपूर्णा, पत्नी स्विटी, पाच महिण्यांचा मुलगा, अविवाहीत बहिण करीश्मा, विवाहीत बहिणी प्रिती रवींद्र जयस्वाल यवतमाळ, पुणे येथील दिपाली विक्रम जयस्वाल व काका मुन्ना जयस्वाल आदी नातेवाईक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT