88.jpg 
विदर्भ

नशेसाठी सॅनिटायझरचा एक घोट ठरू शकतो घातक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर जागतिक आरोग्य संघटनेने अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचा वापर करण्यास सुचवले आहे. त्यामुळे कारखान्यांमध्ये त्याचे उत्पादन होत आहे. मात्र, काही व्यसनाधिन व्यक्ती त्यात अल्कोहोल असते म्हणून नशेसाठी वापर करीत असल्याचे समोर येत आहे. मात्र, सॅनिटायझर पिणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर केवळ हात धुण्यासाठीच करावा. असे आवाहन डॉक्टर करीत आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी तसेच त्यापासून बचावासाठी शासन विविध उपाययोजना करत आहेत. कोरोना विषाणूचे जंतू मारण्यासाठी अल्कोहोल पासून बनवलेले सॅनिटायझर सर्वात परिणामकारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले आहे. त्यामुळे संघटनेने दिलेल्या फॉर्मूल्यानुसारच सॅनिटायझर निर्मितीसाठी कारखान्यांना परवानगी दिली आहे. विविध कारखान्यात तयार होणाऱ्या सॅनिटायझरमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड, ग्लिसरॉल, इथेनॉल हे घटक असतात. हे घटक शरिरासाठी घातक असतात. हे घटक शरीरात गेल्यास अनेकदा मृत्यूही होतो. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दारूची व्यसन जडलेल्या व्यक्तींचे दारू मिळत नसल्याने हाल होत आहे. त्यामुळे इंग्लिश पिणारे हातभट्टीची दारू पित आहे. मात्र, सॅनिटायझर पिण्याचा प्रयोग जीवावर बेतू शकतो, तेव्हा लॉकडाउन संपेपर्यंत तळीरामांनी कळ काढावी असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

होऊ शकतो मृत्यूसुद्धा
सॅनिटायझर मधील घटक शरिरासाठी घातक आहे. त्यात ६० ते ८० टक्क्यापर्यंत अल्कोहोलचे प्रमाण असते. त्यामुळे ते शरिरात गेल्यास उलट्या, डीहायड्रेशन होऊन जठरावर परिणाम होताे. तसेच रक्तसाखरेचे प्रमाण कमी होऊन मृत्यूसद्धा होऊ शकतो. अशीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

वापर फक्त हात धुण्यासाठीच करा
अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरमुळे कोरोना विषाणूचे जंतू लवकर मरतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने याचा वापर करण्यास सुचवले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या फॉर्मूल्यानुसारच त्याचे उत्पादन सुरू आहे. या सॅनिटायझरमुळे हात धुतल्यास हातावरील जंतू नष्ट होतात. यातील घटक शरीरासाठी घातक आहे. ते पिल्यास विषबाधा होऊन मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे याचा वापर केवळ हात धुण्यासाठी करावा. असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SCROLL FOR NEXT