पवनी : बॅंड बंद झाल्यामुळे उपजीविकेसाठी भाजीपाला विकताना राजेश खडसे. 
विदर्भ

लॉकडाउनमुळे बॅंडपथकांचे आर्थिक बजेट कोलमडले...बॅंडवाल्यांवर आली भाजीपाला विकण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

पवनी (जि. भंडारा) : मार्च महिन्यापासून लग्नसराईला सुरुवात होते. यात नाचगाण्याशिवाय कोणताही समारंभ होत नाही. यावरच बॅंड पथकातील लोकांचा रोजगार व वर्षभराची कमाई अवलंबून असते. परंतु, कोरोनामुळे लग्नसमारंभाला मर्यादा आल्या असून बॅंडपथकाचे उत्पन्नाचे साधन हिरावले आहे. यामुळे त्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

पवनी येथे एकूण चार ते पाच बॅंड पथके आहेत. या बॅंड पथकांच्या माध्यमातून जवळपास शंभर कुटुंबांचा संसार चालतो. लग्नसराईमध्ये एका महिन्यामध्ये पथकाला 40 ते 45 ऑर्डर असतात. यामधून एका पथकाला चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळते. परंतु, कोरोना संकटामुळे मिळालेली ऑर्डर रद्द करून घेतलेली रक्कमही परत करावी लागली. यामुळे उत्पन्नावर फटका बसला. बॅंडशिवाय दुसरा पर्यायी जोडधंदा नसल्याचे श्री ताज बॅंड पथकाचे राजेश खडसे यांनी सांगितले. एक दोन सामाजिक संस्थांकडून मदत मिळाली. पण यामध्ये किती दिवस भागणार? असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

वर्षभर पैशाची चणचण

लॉकडाउनमुळे कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आता लग्नसराईचा हंगाम गेल्याने वर्षभर पैशाची चणचण. मुलांच्या शिक्षणासाठी शाळेत शुल्क भरावे लागणार आहे. खर्चासाठी काही जणांकडून उधार घेतलेले पैसे खर्च झालेत. आता त्यांचे पैसेसुद्धा परत करायचे आहेत, असे श्री. खडसे यांनी सांगितले. याच पथकातील खटू शेंडे यांच्या कुटुंबात 11 लोक आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. पावसाळ्यात घर गळते, पण दुरुस्ती करता येत नाही. जोडधंदा म्हणून भाजी विक्री सुरू आहे. यातून दिवसाला 70 ते 80 रुपये मिळतात, असे त्यांनी सांगितले.

शासनाने मदत करावी
लग्नसराईत आम्ही तिघे मिळून 50 हजार रुपये कमावतो. आता अंत्ययात्रेलाही कोणी बोलवत नाही. त्यामुळे आता कसे जगावे, असा प्रश्न पडला आहे. लोकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी? आमच्या व्यथा लोकप्रतिनिधींनी शासनासमोर मांडाव्यात, शासनाने आम्हाला मदत करावी.
- खटू शेंडे, श्री ताज बॅंड पथक पवनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT