अंकिसा : मेडीगड्डा धरणाचे फाटक उघडण्याचा प्रयत्न करताना नागरिक. 
विदर्भ

मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचातील नागरिकांचा रस्ता झाला बंद, गेटच्या फाटकाला लागले कुलूप

व्यंकटेश चकिनाला

अंकिसा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्याला भरभरून समृद्धी आणि महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्‍याला पुराचे संकट देणारा येथील महाकाय मेडीगड्डा प्रकल्प आता येथील नागरिकांचीही अडवणूक करू लागला आहे.

या धरणावरूनच तालुक्‍याच्या अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. पण, आता येथे फाटक लावून त्याला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे येथून दैनंदिन कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सिरोंचा तालुक्‍यातील मेडीगड्डा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाराष्ट्र सरकारचे नुकसान होत असतानाही तत्कालीन भाजप सरकारच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. अनेक लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशा वल्गना केल्या होत्या. पण, सिरोंचातील अनेक शेतकऱ्यांची शेती, घरे पाण्यात बुडतील हे माहिती असतानाही मोठ्या चतुराईने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

नागरिकांना जावे लागते नदीच्या पात्रातून

या प्रकल्पाचा तालुक्‍यातील नागरिकांना कोणताही विशेष लाभ होत नाही. उलट या धरणाने येथील नागरिकांचा रस्ता अडवला आहे. या मेडीगड्डा बॅरेजच्या गेटला कुलूप लावून असल्यामुळे सिरोंचा तालुक्‍यातील सर्व गावांतील लोकांच्या कामाच्या समस्या वाढल्या आहेत. आधीच कोरोनामुळे सर्व लोकांचे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे. येथील अतिदुर्गम भागातील सोमनपल्ली, पातागुडम, असरअल्ली, टेकडा, यासारख्या गावांतील नागरिकांना नेहमीच विविध रोजगार व मजुरीसाठी या बॅरेजला पार करून जावे लागते. त्याशिवाय त्यांची अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज पूर्ण होत नाही. मात्र, येथील नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही या बॅरेजच्या गेटचे कुलूप अद्याप उघडण्यात आले नाही.

कुलूप उघडून रस्ता मोकळा करा

त्यामुळे नागरिकांना मोठ्या अंतराचा वळसा घेऊन तेलंगणा राज्यात जावे लागत आहे. सोमनपल्ली, पातागुडम यासारख्या गावांतील लोक कामासाठी नदीच्या पात्रातून पायदळ जात जीवघेणा प्रवास करत आहेत. नदीच्या पात्रातूनही त्यांना १५ ते १६ किलोमीटर चालून जावे लागत आहे. या बॅरेजचे गेट बंद असल्यामुळे लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. गेट बंद असल्यामुळे त्यातून कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. लोकांनाही जाण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून कुलूप उघडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

फायद्यापेक्षा तोटाच अधिक…

मेडीगड्डा प्रकल्प तेलंगणा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तेथील भूमी सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्‍यासाठी संकटेच घेऊन आला आहे. या प्रकल्पाचे पाणी तेलंगणाला मिळते. त्यासाठी तेलंगणा सरकारने मोठमोठ्या पाइपलाइन, उपसा यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने आपल्या वाट्याच्या पाण्यासाठीही विशेष काही केले नाही. शिवाय या प्रकल्पामुळे पुराचा धोका असल्याने फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT