Dussehra sakal
विदर्भ

Dussehra : आमच्या देवाला जाळण्याआधी आम्हाला जाळा

गोंडपिपरीत रावणदहणाचा कार्यक्रम थांबविला

संदीप रायपुरे

गोंडपिपरी : रावण आमचा देव आहे.त्यांना जाळायचे असेल तर आधी आम्हाला जाळा अशी आक्रमक भुमीका गोंडपिपरीत आदिवासी युवती व महिलांनी घेतली.यानंतर काही काळासाठी वातावरण तापल.यानंतर रावण दहनाचा कार्यक्रम थांबविण्यात आला.दरम्यान ठाणेदार जिवन राजगूरू यांनी प्रभावी समन्वय साधत शांततेचा मार्ग काढला.

दस-याच्या निमित्तान आज गोंडपिपरी येथील गजानन काँलेजच्या मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.गोंडपिपरी येथील नागरिकांनी यासाठी जय्यत तयारी केली होती.गजानन काँलेजच्या पटांगणावर रावणाची प्रतीकृती तयार करण्यात आली.गावातुन रँली काढीत लोक रावण दहनासाठी निघाले.

दरम्यान रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची माहिती आदिवासी बांधवांना मिळाली.भाजपच्या नगरसेविका तथा युवा कार्यकर्त्यां मनीषा मडावी,डाँ.सफल कोटनाके,निर्मला मडावी,उषा आलाम,सुरेखा मडावी विजया मडावी यांच्यासह आदीवासी समाजातील तरूण मंडळी गजानन काँलेज परिसरात दाखल झाली. रावण आमचा देव आहे.आमच्या देवाला जाळण्याआधी आम्हाला जाळा अशी भुमिका घेत रावण दहनाला विरोध केला.यावेळी काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान घटनेची माहिती कळताच ठाणेदार जिवन राजगुरू घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणात त्यांनी प्रभावी समन्वय साधून प्रकरण शांत केले.

गोंडपिपरीत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आहेत येथील आदीवासी चौकात ते रावणाची पूजा करतात.एकीकडे आपल्या देवाची पुजा होत असतांना दुसरीकडे रावणदहन होत असल्याने महिला संतापल्या.गोंडपिपरी शांतप्रिय गाव म्हणून ओळखल्या जातो.आज गोंडपिपरीवासीयांनी या प्रकरणी शांतता दाखवून ते सिध्द केल.

रावण आमचा देव आहे.आम्ही आमच्या देवाला जाळतांना चूप राहू शकत नाही.आमच्या पुर्वजांनी हे सहन केल असेल पण यापुढ हि कुप्रथा बंद व्हायला हवी.

मनीषा मडावी

नगरसेविका तथा आदिवासी कार्यकर्ती.गोंडपिपरी

ठाणेदारांनी समन्वयातून काढला तोडगा...

रावण दहनावरून आज गोंडपिपरीत वातावरण काही काळासाठी तापले.पण ठाणेदार राजगुरू घटनास्थळी दाखल होताच त्यांनी परिस्थीती हाताळीत समन्वयाने तोडगा काढला.

अन शेवटी रावनदहनाचा कार्यक्रम रदद करावा लागला.

दरम्यान याप्रकारानंतर आदिवासी बांधवाःनी आदिवासी चौकात रावणाच्या पुजेचा कार्यक्रम संपन्न केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारत सोडले उपोषण; म्हणाले- आज सोन्याचा दिवस

Latest Marathi News Updates: आंदोलन यशस्वी झाल्याने जरांगेंना अश्रू अनावर

Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

Maratha Reservation : मराठा-मुस्लीम एकतेचे दर्शन; आंदोलकांसाठी आडूळ गावातून पाठवले खाद्यपदार्थ

Maratha Reservation and Satara Gazette : 'सातारा गॅझेट' म्हणजे नेमकं काय अन् मराठा आरक्षण आंदोलनात का आहे याला महत्त्व?

SCROLL FOR NEXT