RTE_education.jpg 
विदर्भ

आरटीई प्रवेश; शाळांना मिळाली संधी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळांनी निश्‍चित मुदतीत नोंदणी न केल्यामुळे शिक्षण विभागाने शाळांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता आरटीई पात्र शाळा 8 फेब्रुवारीपर्यंत शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करू शकतील. मुदतवाढीनंतर सुद्धा शाळांनी नोंदणीची तत्परता न दाखवल्यास आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

आरटीई शिक्षणहक्क कायद्यानुसार समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खाजगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त शिक्षण व प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते, परंतु आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खाजगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. हा कायदा शाळांचा प्रवेश टप्पा जेथून सुरू होतो त्या पहिल्या वर्गापासून राबवला जातो.

यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील शाळांच्या नोंदणीसह अर्ज भरण्याची व पहिली सोडत जाहीर करण्याचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले होते. त्याअंतर्गत 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत शाळांची नोंदणी करणे आवश्‍यक होते. परंतु निश्‍चित मुदतीत जिल्ह्यातील शाळांनी नोंदणी न केली नाही. त्यामुळे शासनाच्या शिक्षण विभागाने नोंदणीची मुदत दोन दिवसांनी वाढविली आहे. परिणामी शाळा आता 8 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करू शकतील. 

149 शाळांनीच केली नोंदणी
आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील 209 शाळा पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी 149 शाळांनी शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी केली आहे. परंतु अद्याप 60 शाळांची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे नोंदणी न करणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. ही बाब लक्षात घेवून शिक्षण विभागाने शाळांच्या नोंदणीची मुदत वाढविली आहे. 

असे आहे संभावित वेळापत्रक

  • पालकांनी वेबसाईटवर अर्ज भरणे - 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी
  • पहिली सोडत - 11 मार्च ते 12 मार्च 
  • प्रवेश घेणे - 16 मार्च ते 3 एप्रिल
  • प्रतिक्षा यादी विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेणे टप्पा एक - 13 ते 18 एप्रिल
  • प्रतिक्षा यादी विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेणे टप्पा दोन - 24 ते 29 एप्रिल
  • प्रतिक्षा यादी विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेणे टप्पा तीन - 6 ते 12 मे
  • प्रतिक्षा यादी विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेणे टप्पा चार - 18 ते 22 मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT