Eight hours after the terror Sarpamitra rescued the family wardha news 
विदर्भ

कुटुंबीयांचे जेवण आटोपले आणि झोपण्याच्यावेळी घरात झाले नागोबाचे दर्शन; मग काय सदस्यांची रात्र गेली रस्त्यावर

गजानन गारघाटे

गिरड (जि. वर्धा) : कुटुंबीयांचे भोजन आटोपले आणि ऐन झोपण्याच्या वेळी घरात नागोबाचे दर्शन झाले अन्‌ सदस्यांची तारांबळ उडाली. घरात नागोबाच्या दहशतीने परिवाराला रात्र घराबाहेर रस्त्यावर काढावी लागली. शेवटी तब्बल आठ तासांनंतर सर्पमित्राच्या मदतीने या नागोबाच्या दहशतीतून कुटुंबीयांची मुक्तता झाली. ही घटना समुद्रपूर तालुक्‍यातील शिवणफळ या गावात घडली.

शिवणफळ येथील मुरलीधर शेळके यांच्या घरात रात्री ९ वाजताच्या दरम्यान नागोबाचे दर्शन झाले. दरम्यान, या नागोबाला बघताच कुटुंबातील सदस्यांची भंबेरी उडाली. गावकऱ्यांनी या नागाला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

काहींनी या नागोबाला ठार करण्याचासुद्धा पवित्रा घेतला. मात्र, नागोबा एकाच ठिकाणी फणा काढून उभा असल्याने साप मारणाऱ्या बहाद्दरांची हुशारी चालली नाही. सापाला हाकलण्यासाठी विविध उपाय करण्यात आले. असे असले तरी नागराज आपली जागा सोडायला तयार नव्हते.

याच काळात गिरड येथील सर्पमित्रांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, वेळीच सर्पमित्र उपलब्ध न झाल्याने शेळके कुटुंबीयांना हताश होऊन रात्र घराबाहेर रस्त्यावर काढावी लागली. सकाळी सहा वाजताच्या सुमारास मोहगाव येथील सर्पमित्र खुशाल शेळके, अमित शेळके, पवन झाडे, यांनी अर्थ्या तासाच्या परिश्रमातून या नागाला जेरबंद करून आठ तासांच्या दहशतीतून शेळके कुटुंबीयांची सुटका केली. हा नाग पाच फूट पाच इंचीचा होता. त्या सापाला सर्पमित्रांनी मोहगाव येथील जंगलात नेऊन सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT