four police officers transferred from yavatmal 
विदर्भ

यवतमाळमधील आठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली

सूरज पाटील

यवतमाळ : जिल्हा पोलिस दलात आपला कार्यकाळ पूर्ण करणारे चार पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या परजिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्या आहेत, तर दोन पोलिस निरीक्षक गडचिरोली येथून जिल्ह्यात आले आहेत. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या आदेशाने या बदल्या दिवाळीत करण्यात आल्या आहेत. 

दिवाळीपूर्वी पोलिस दलात बदली सत्र सुरू झाले आहे. यवतमाळ ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संजय शिरभाते यांना अमरावती येथील जातपडताळणी समितीत नियुक्ती मिळाली. कळंबचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांची बदली वाशिम जिल्ह्यात जिल्हा जातपडताळणी समितीत झाली. बाभूळगावचे सतीश जाधव हे नागपूर, तर अशोक नाझन यांची बदली नाशिक येथे करण्यात आली. जिल्ह्यात अजित राठोड, प्रकाश तुनकनवार हे दोन पोलिस निरीक्षक बदलून आले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशीष इंगळे, वडगाव जंगलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेश रणधीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक निखिल फटींग, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल खलसे यांचीही बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय MGR बनले तर...? तामिळनाडूत सत्तेसाठी सुरू मोठा राजकीय गेम, AIADMK अन् DMK मध्ये संभाव्य युती, भाजपचीही एंट्री

NCP Rajya Sabha News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी?

Shaktipeeth Highway New Alignment : कोल्हापूरातील ७८ गावांतून जाणार ‘शक्तिपीठ’ महामार्ग; तालुकानिहाय गावांची यादी जाहीर, नव्याने अधिसूचना जारी

Satara Crime: साताऱ्यात संतापजनक प्रकार! तरुणीला अंधाऱ्या रस्त्याकडे ओढून नेण्याचा प्रयत्न, आक्रोश ऐकताच नागरिक धावले अन्..

Moringa Paratha Recipe: इम्युनिटी वाढवणारा आणि चवीला भन्नाट शेवग्याच्या पानांचा पराठा नाश्त्यासाठी आहे बेस्ट!

SCROLL FOR NEXT