विदर्भ

Shinde vs Thackeray : बुलढाण्यात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

सकाळ डिजिटल टीम

बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदेगटातील नेत्यांकडून एकमेकांमध्ये अनेक दिवसांपासून शाब्दिक वाद अनेकदा घडल्याचे सर्वांनीच माहिती आहे. मात्र, आज चक्क शिवसेना आणि शिंदे गटातील कार्याकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला असून, हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही कार्यकर्त्यांमधील हा वाद सोडवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. बुलढाण्यात आयोजित शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्यात हा सर्व प्रकार घडला आहे.

बंडखोरीनंतर शिवसेनेतील फूट भरून काढण्यासाठी राज्यभर ठाकरेंकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जात आहे. बुलढाण्यातही नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ठाकरेंकडून करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करत आम्हीच शिवसेना असा दावा करत गोंधळ घातला. यात दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांत भिडले. याघटनेमुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचं वातावरण पसरले होते.

त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या गोंधळात संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता शाब्दीक चकामकींनंतर थेट हातापायीपर्यंत आल्याचे आजच्या घटनेवरून आधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT