मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
विदर्भ

मुख्यमंत्र्यांची यात्रा रोखणार निवडणूक आयोग!

नीलेश डोये

नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर यात्रा काढली होती. त्यावेळी बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांची यात्रा रोखली होती. आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेदरम्यान तसा अनुभव येण्याची शक्‍यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांची यात्रा रोखली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दीड ते दोन महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 1 ते 31 ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. ही यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारने केलेल्या कामासोबत नवीन काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार, अकोला, वाशीम व धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्‍ती करून महिनाभरात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्‍यता आहे. पाच जिल्ह्यांत निवडणुका असल्या तरी याचा परिणाम राज्यावर होईल. सरकारला धोरणात्मक निर्णय घेताना अवघड जाणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला फटका बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT