Electricity theft at two hotels  
विदर्भ

गोंदियात दोन हॉटेलमध्ये वीजचोरी 

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : शहरातील दोन ठिकाणच्या नामवंत हॉटेलमध्ये महावितरण अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तेथील वीज मीटरची पाहणी केली असता किट लावून वीज चोरी करताना दिसून आले. ही कारवाई नुकतीच करण्यात आली. 
शहरात वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, गुप्त माहितीवरून महावितरणचे कार्यकारी अधिकारी अभियंता चंद्रशेखर करंडे यांनी ब्ल्यू डायमंड फॅमिली बार ऍण्ड रेस्टॉरेंट येथे छापा टाकला. तेथील मीटरची तपासणी करण्यात आली. मीटरमधील लाल रंगाचे वायर शॉट करून व मीटरमध्ये अतिरिक्‍त किट जोडून 10 लाख 3 हजार 640 रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच गोंदिया- बालाघाट मार्गावरील दीपक हॉटेल येथे प्रभारी अतिरिक्‍त कार्यकारी अधिकारी अभियंता मंगेश आनंदराव कन्नाके यांनी छापा टाकला. तेथील मीटरची तपासणी केली असता अवैधरित्या 4 हजार 370 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. वीज चोरीच्या दोन्ही प्रकरणांमध्ये गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT