eleven youth run away from custody of amravati police 
विदर्भ

बाहेर तैनात होता पोलिस कर्मचारी, युवकांनी दिला चकवा अन्...

सकाळ वृत्तसेवा

तिवसा (जि. अमरावती) : कोरोनामुळे कंपन्या बंद झाल्याने जालना येथील एका कंपनीत काम करणारे 11 युवक आपल्या गावी गोंदिया येथे पायदळ जात होते. अशात त्यांना तिवसा येथे अडवून जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारी (ता.15) रात्री 9.40 च्या सुमारास या ठिकाणी एक पोलिस कर्मचारी तैनात असूनही खोलीतून कवेलू फोडून यातील सात युवक चकमा देऊन पळाल्याची धक्कादायक घटना घडली.

तिवसा येथील प्रकार

जालना येथून 11 युवक पायदळ नागपूरच्या दिशेने आपल्या गावी गोंदियाला जात होते. मात्र 14 एप्रिल रोजी त्यांना तिवसा प्रशासनाने पकडून येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते, तर याठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. मात्र रात्री 7 युवकांनी छतावरील कवेलू फोडून वर प्रवेश केला व पळ काढला, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र जिल्हा व राज्य बंदी असूनही या युवकांनी कसा काय प्रवास केला याबाबत तपास सुरू आहे.

कशाला काढला पळ?

या युवकांना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने तुम्हाला सोडण्यात येईल, तुम्ही गाडी बोलावून घ्या असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आदल्या दिवशी गाडी बोलावून घेतली, मात्र अचानक त्यांना जाऊ दिले नाही. त्यामुळे या युवकांनी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना चकमा दिल्याचे सांगण्यात येते.

पळून गेलेली मुले शेल्टर होममध्ये नव्हते, एका वाहनात पाचपेक्षा अधिक लोकांना जाता येत नाही. त्यामुळे त्यांना तात्पुरते त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यांना परवानगी मिळाल्यानंतर आम्ही सोडले असते, मात्र ते न सांगताच निघून गेले.
- वैभव फरतारे, तहसीलदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT