file phote 
विदर्भ

पात्रांना डावलून ज्येष्ठांना पीएसआय बनविण्याचा घाट!

अनिल कांबळे

नागपूर : राज्य पोलिस दलात पीएसआय अधिकाऱ्यांची वानवा असतानाच पोलिस महासंचालकांनी राज्यभरातील पोलिस हवालदार आणि सहायक फौजदारांची सेवाज्येष्ठता यादी मागितली आहे. त्यांना पीएसआय पदावर (ऍडव्हॉक) पदोन्नती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 2013 पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असताना पोलिस दल बंदोबस्तासाठी सज्ज आहे. मात्र, पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता आहे. केवळ तीन हजार पोलिस उपनिरीक्षकांवर बंदोबस्ताची मदार आहे. पीएसआय कमी असल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर तपास, चौकशी आणि गुन्हे प्रकटीकरणाचे दडपण आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस महासंचालक कार्यालयाने सर्वच आयुक्‍तालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयांना पत्र पाठवून राज्यातील पोलिस हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकांची अद्ययावत यादी मागितली. ती यादी 23 सप्टेंबरपर्यंत पाठविण्याची मुदत होती.ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची यादी बोलविल्यामुळे उपनिरीक्षक अर्हता 2013 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या गोटात खळबळ उडाली. पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना डावलून कोणतीही परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या कर्मचाऱ्यांना 11 महिन्यांच्या करारावर (ऍडव्हॉक) पदोन्नती देण्याची तयारी वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा निवडणूक आणि नवरात्र बंदोबस्तावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिस दलात खदखद
जे कर्मचारी पीएसआय पदावर पदोन्नती मिळण्यासाठी पात्र आहेत आणि उत्सुकही आहेत, अशा पोलिसांची कोणतीही दखल पोलिस महासंचालक कार्यालयातून घेण्यात येत नाही. मात्र, ज्यांना गरज नाही किंवा अनुत्सुक आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत विचार करण्यात येत असल्यामुळे राज्य पोलिस दलात तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्यास त्याचा परिणाम थेट राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पडण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT