engineer arrested in bribe case in morshi of amravati  
विदर्भ

११ हजार रुपये लाच मागणे पडले महाग, कार्यकारी अभियंत्याला अटक

संतोष ताकपिरे

मोर्शी (जि. अमरावती) : स्थानिक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मोर्शी येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले धर्मेंद्र मानकर यांना लाच स्वीकारताना बुधवारी अटक करण्यात आली. 

वरुड येथील शासकीय इलेक्‍ट्रिकल कंत्राटदार यांच्याकडून एनएससी इन्फ्रा स्कीमअंतर्गत बारगाव, जरुड व पेठ मंगरुळी गावामध्ये केलेल्या कामाच्या देयकावर सही करून नेहमीप्रमाणे एकूण बिलाच्या एक टक्क्याने सहा हजार रुपये व घोडदेव गावातील पोल्ट्री फार्मच्या कनेक्‍शनचे अंदाजपत्रक मंजूर करून दिल्याबद्दल पाच हजार रुपये, असे एकूण ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी मानकर यांनी केली होती.  त्यावरून संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून बुधवारी (ता. १०) सापळा रचण्यात आला. यामध्ये कार्यकारी अभियंता मानकर यांनी त्यांच्या कार्यालयाच्या कॅबिनमध्ये तक्रारदार यांच्याकडून ११ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावरून कार्यकारी अभियंता मानकर यांना ताब्यात घेण्यात आले. 

ही कारवाई लाचसुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत, पोलिस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक राहुल तसरे, विनोद कुंजाम, युवराज राठोड, सुनील जायभाये, पंकज बोरसे, वाहनचालक सतीश किटुकले यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

SCROLL FOR NEXT