market 
विदर्भ

अमरावतीत निर्बंध अधिक कठोर; जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने दुपारी तीनपर्यंतच खुली

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा आता वाढल्याने हळूहळू परत एकदा आपण लॉकडाउनकडे जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातूनच आता निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून दुपारी तीन वाजेपर्यंतच जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे दुपारी तीन वाजता नंतर रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्र्यांनी वारंवार नागरिकांना आवाहन करून घरीच राहण्याचा सल्ला दिला. तरीसुद्धा काही लोकं विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने त्यांची रस्त्यावरच तपासणी करून कारवाईला सुरुवात झाली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातसुद्धा सध्याच्या स्थितीत रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असून येत्या काही दिवसांत रुग्णालयांमध्ये बेडदेखील उपलब्ध राहतील किंवा नाही, याची शंका घेतली जात आहे.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने आता सकाळी सातपासून दुपारी तीनपर्यंतच सुरू राहतील. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत आदेश जारी केला. हा आदेश 30 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील.

हॉटेलची घरपोच सेवा

संचारबंदीत अधिक निर्बंध घालण्यात आले असले तरी हॉटेल, उपाहारगृहे, बार व खाद्यगृहांना सायंकाळी सहापर्यंत घरपोच सेवा देता येईल.

इतर तरतुदी कायम

पूर्वीच्या आदेशातील इतर तरतुदी कायम आहेत. सर्व रुग्णालये, लसीकरण केंद्रे, उपचार केंद्रे, प्रयोगशाळा, पेट्रोलपंप, एटीएम केंद्रे, औषधी दुकाने, वैद्यकीय उपकरणे पुरविणारे उत्पादक, वितरक, वैद्यकीय विमा कार्यालये आदी सर्व सेवा त्यांच्या वेळेत सुरळीत सुरू राहतील.

596 नवे कोरोनाबाधित

विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार जिल्ह्यात आज 596 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 56 हजार 572 झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अमीर रशीद अलीची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT