संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

आंदोलनाचा बसला विद्यार्थ्यांना फटका, परीक्षा ढकलल्या पुढे

कृष्णा लोखंडे

अमरावती : विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा थेट फटका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. एक ऑक्‍टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या परीक्षा अनिश्‍चित काळाकरिता पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षानियंत्रक डॉ. हेमंतकुमार देशमुख यांनी सांगितले.

संप संपेल तेथून सात दिवसांनी परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित करता येणार आहे. त्यामुळे सध्यातरी संप संपण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही ते म्हणाले. २४ सप्टेंबरपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठातील सर्वच कामकाज ठप्प पडले आहे. परीक्षांच्या ऐन तोंडावरच संप पुकारण्यात आल्याने एक ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाइन परीक्षांचे नियोजित वेळापत्रक पार कोलमडले आहे. विद्यापीठातील सर्वच शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी असल्याने ऑनलाइन परीक्षांची कामे अर्धवट आहेत. विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व रोलनंबर पाठविणे शक्‍य झालेले नाही. कोलमडलेल्या नियोजनाचा आढावा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी घेतला असून नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेणे अशक्‍य असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंतकुमार देशमुख यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

ही बाब राज्यपाल व उच्च शिक्षण संचालकांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसदर्भात संभ्रम राहू नये, यासाठी विद्यापीठाकडून नवे पत्रक प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपण्याची चिन्हे अजूनही धूसर आहेत. सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी प्रतीक्षेशिवाय सध्या काहीच पर्याय नाही. संप संपेल त्या दिवसापासून सात दिवसांत परीक्षांचे नियोजन करण्यात येणार असून वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे डॉ. हेमंतकुमार देशमुख यांनी स्पष्ट केले.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Relief: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारकडून ३३४.९८ कोटींच्या मदतीला मंजुरी, मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

T20 WC India Semifinal Scenario : द. आफ्रिकेच्या पोरींनी बाजी मारली, भारतीय संघाची झोप उडवली; उपांत्य फेरीत कोण पोहोचणार अन् कसे?

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर येईल 'ग्लो'! फॉलो करा या ५ सोप्या स्कीन केअर टिप्स

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप

Gokul Dairy Election BJP Kolhapur : गोकुळ दूध संघात मुश्रीफ वरचढ की महाडिक?, भाजप शक्तिप्रदर्शनाने ठराव करणार दाखल; महाडिक गटाकडून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT