sakal
विदर्भ

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपारच्या नोटीसने खळबळ

दिग्रसचे २० युवक तडीपार

सकाळ डिजिटल टीम

दिग्रस : सर्वत्र सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता दिग्रस पोलिसांनी शहरातील २० युवकांना तीन दिवसाकरीता तडीपारीची नोटीस बजावली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटीस मुळे संपूर्ण दिग्रस शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील २० युवक शासनाचा आदेश झुगारून गणेशोत्सवामध्ये शांतता भंग करू शकतात. असा ठपका पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आला असून गणेश मंडळाचे सदस्य तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा या २० युवकांमध्ये समावेश आहे.

गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस म्हणजेच ता.१८, ता.१९ व गणेश विसर्जनाचा दिवस ता.२० हे तीन दिवस या २० युवकांना दिग्रस तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून युवकांना तडीपार करण्याचा आदेश काढल्याची माहिती दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी 'दै. सकाळ'शी बोलताना दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील २० युवकांना नोटीस दिल्याने संपूर्ण दिग्रसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; ‘एनडीआरएफ’कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू

Love Affair Wife killed husband : लग्नापूर्वीच संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह नाल्यात फेकून पुरला; 3 महिन्यांनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Spain vs Belgium : स्पेन १६ वर्षानंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत; मिकेल मेरिनोचा निर्णायक गोल, बेल्जियमचे आव्हान संपुष्टात

Maharashtra Off-Budget Debt : महसुली तूट वाढली, महाराष्ट्रावर २८ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर; कॅगचा गंभीर इशारा

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT